महाराष्ट्र सामाजिक

सेलू येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात 1924 लाभार्थ्यांना लाभ

वर्धा जिल्हा प्रतिनिधी पंकज तडस

सेलू येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात 1924 लाभार्थ्यांना लाभ

आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

लाभार्थ्यांची शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थिती

सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या शासकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्यावतीने संपूर्ण राज्यभर शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सेलू येथे आयोजित शिबिरात एकाच दिवशी 1 हजार 924 लाभार्थ्याना लाभ देण्यात आला. शिबिराचे उद्घाटन आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, तहसिलदार महेंद्र सुर्यवंशी यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विभागांनी आपल्या कार्यालयाचे स्टॉल कार्यक्रमस्थळी लावले होते. नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध शासकीय योजनांची माहिती देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना दिली.

या शिबिरात संजय गांधी योजनेच्या 170 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. 42 लाभार्थ्याना राशनकार्ड तर 168 लाभार्थ्यांना सेतू प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मनरेगाचे 32 लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना 17 लाभार्थी, शबरी आवास योजना 7, रमाई आवास योजना 9, स्वच्छ भारत योजनेच्या 15 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर इतर 132 दाखल्यांचे वाटप पंचायत समितीच्यावतीने करण्यात आले.

कृषी विभागाच्यावतीने यांत्रिक अवजारे, ट्रॅक्टर, ठिंबक/तुषार सिंचनचा 248 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर महिला व बाल विकास विभागाच्यावतीने माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत 10 लाभार्थ्यांना मुदत ठेवीचे वाटप करण्यात आले. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने 40 लाभार्थ्यांना नगर भूमापन नक्कल, 30 लाभार्थ्यांना मोजणीची क प्रत तर 55 लाभार्थ्यांना सनदचे वाटप करण्यात आले.

आरोग्य विभागाच्यावतीने 52 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. 302 रुग्णांची तपासणी, 70 रुग्णांची रक्तगट तपासणी, 42 रुग्णांची रक्त तपासणी, 258 रुग्णांची आरोग्य तपासणी, 159 रुग्णांची बीपी व शुगर तपासणी तर 66 कुष्ठरोग व क्षयरोगाची तपासणी करण्यात आली. शिबिरास संपुर्ण तालुक्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Copyright ©