महाराष्ट्र सामाजिक

तृतीयपंथी वकील शिवानीच्या प्रयत्नाने गरीब ऑटो चालकास मिळाली मदत

तृतीयपंथी वकील शिवानीच्या प्रयत्नाने गरीब ऑटो चालकास मिळाली मदत

जितेंद्र पिंपळे या ऑटो चालकाने उन्नती मोटर्स वर्धा मार्फत बॅटरीवर चालणारा ऑटो कर्ज घेऊन विकत घेतला होता. ऑटोच्या बॅटरी मध्ये दोष असल्यामुळे ऑटो चालकाने सदर बाब उन्नती शोरूम कडे नेली असता त्यांना बॅटरी दुरुस्त न करून देता उडवा उडवीची उत्तरे देऊन परत करण्यात आले. हा प्रकार दोन ते तीन वेळा घडला. नैरास्यमय झालेल्या ऑटो चालकीची कहानी शिवानी सुरकार च्या कानावर पडताच शिवानीने या बाबीवर दखल घेण्याचे ठरविले,वकील या नात्याने शिवानीने एक नोटीस उन्नती मोटर्स नागपूर व वर्धा यांना पाठविला. सात पृष्ठाच्या या इंग्रजी भाषेमधिल नोटीस मध्ये मागणी केल्याप्रमाणे कंपनीने ऑटो चालकास अखेर ऑटोचा दोष दुरुस्त करून दिला. तसेच थोड्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई सुद्धा दिली. शिवानीच्या या प्रयत्नामुळे एका गरीब ऑटो चालकाची दैनंदिन आमदनी पुन्हा सुरू झाली. पण ऑटो चालकास जो मानसिक मानसिक आणि शारीरिक त्रास झाला तसेच अधिक नुकसान भरपाई मिळण्याकरिता पुढील कायदेशीर कार्यवाही वकील शिवानी सुरकार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यामध्ये शिवानी अग्रेसर असून मागील काही वर्षांमध्ये त्यांनी अनेक गरिबांच्या समस्या सुद्धा सोडविल्यात तसेच त्या एक रुग्ण मित्र देखील आहेत.

Copyright ©