महाराष्ट्र सामाजिक

रस्त्यावरील झाडे वाढल्याने अपघातात वाढ

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

रस्त्यावरील झाडे वाढल्याने अपघातात वाढ

देवळी शहरातील मुख्य वरदळी चा रस्त्यात मोजल्या जाणाऱ्या सोनेगाव चौफुली येथे वर्धा यवतमाळ मार्गावर नगरपरिषद स्टेडियमला लागून हा वळण रस्त्यावरील काटेरी झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे काटेरी झाडांचे प्रमाण इतके वाढले की वळण रस्त्यावरून येणाऱ्या लहान वाहनांना समोरील रस्ता अस्पष्ट दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमध्ये येथे भिडत झालेली आहे.त्यामुळे अनेक लोक गंभीरित्या जखमी झालेले आहे.

मागील महिन्यात पडलेल्या अकाळी पावसामुळे रस्त्यावरील झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे वाहन चालकांना या वळणावर मोठ्या प्रमाणात येण्या जाण्यास समस्या निर्माण होत आहे संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे त्यामुळे येजा करणाऱ्या नागरिकांना वाढलेल्या काटेरी झाडांचा त्रास सहन करावा लागत आहे अनेक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद कार्यालय यांच्याकडे तोंडी तक्रार केल्या आहे तरीही या काटेरी झाडांकडे कोणत्याच विभागाचे लक्ष दिलेले नाही हे आपली जबाबदारी एकमेकांकडे ढकलत आहे परंतु भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.जर येथे अपघातामध्ये जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोणता विभाग राहील अशी चर्चा शहरात नागरिक करीत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित कामचोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शहरात होत आहे.

Copyright ©