यवतमाळ सामाजिक

एसटी बसचे मिनी बस स्टँड मिळण्याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

एसटी बसचे मिनी बस स्टँड मिळण्याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

येथील पांढरकवडा रोडवरील जाफर नगर चौक व कोहिनूर सोसायटी चौक येथे एसटी बसचे मिनी बस स्टैंड मिळण्याकरिता समाज सेवक जुल्फीकार अहेमद उर्फ बबली भाई, मो. साजिद, रिजवी पेंटर, हमीदउल्ला खान वहिदउल्ला खान, सै. इरशाद अली, सौ. मोहम्मद अली, जियाउल करिम, फरासत खान, सलाबत खान, सरफराज खान, शब्बीर खान, शेख तारिक शेख आसिफ, अमीनोद्दीन शाकीर, मोईनोद्दीन शेख आदिंनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना दि. २२ मे रोजी निवेदन देऊन कोहिनूर सोसायटी चौक व जाफर नगर चौक येथील नागरिक मोठ्या प्रमाणात बस मध्ये प्रवास करतात परंतु थांबा नसल्यामुळे बस समोर जाऊन थांबते त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तास न तास उन्हात, पावसात बसची वाट बघत उभे राहावे लागते. याकरिता जाफर नगर चौक व कोहिनूर सोसायटी चौकच्या दरम्यान बसचे मिनी बस स्टैंड लावण्यात यावे अशी मागणी रेटून धरली. पालकमंत्री संजय राठोड यांनी या मागणी बद्दल सहमती दर्शवून वरिल विषयांनुषगांने महा मंडळाच्या अधिकाऱ्यांना या बाबत सुचना करुन जनतेची मागणी पुर्ण करण्याचे अभिवचन दिले. याप्रसंगी शामीन शाहा, मोहसिन शेख, साकिब शेख, राफी मिर्झा, साहिल शेख, फैजान शेख, सोयेब शेख, मोहाफीज शेख, आदि उपस्थित होते.

Copyright ©