महाराष्ट्र सामाजिक

जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

वर्धा ( जिल्हा प्रतिनिधी) पंकज तडस

जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा सदन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एन,करमरकर व प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा, आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम बाम्बटकर, डॉ. दिपाली नाखले, सामाजिक कार्यकर्ते राहुल बुचुंडे, हर्षद ढोबळे तसेच एनसीडी, आरबीएसके व महालॅबची चमू उपस्थित होती.

आरोग्य हा मानवी जिवनातील महत्वाचा घटक असून उत्तम आरोग्य हे प्रत्येकाचे लक्ष बनले पाहिजे याबाबत मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. तंबाखु पासुन आरोग्यावर होणाऱ्या विविध प्रकारच्या दुष्परिणामाची माहिती देखील यावेळी देण्यात आली. यावेळी न्यायीक अधिकारी, कर्मचारी, अधिवक्ता, विधी स्वयंसेवक तसेच उपस्थित पक्षकार अशा एकुण 127 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच 44 व्यक्तींची आभा आरोग्य कार्ड करीता नोंदणी करण्यात आली असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Copyright ©