यवतमाळ शैक्षणिक

शोतोकाॅन कराटे डो असोसिएशन यवतमाळ संलग्न शोतोकाॅन कराटेची बेल्ट परीक्षा संपन्न

शोतोकाॅन कराटे डो असोसिएशन यवतमाळ संलग्न शोतोकाॅन कराटेची बेल्ट परीक्षा संपन्न

शोतोकाॅन कराटे डो असोसिएशन यवतमाळ संलग्न शोतोकाॅन कराटे डो ऑर्गनायझेशन इंडिया द्वारे 19 ते 21 मे 2023 ला शंकरलाल कोठारी स्कूल व प्रयासवन यवतमाळ येथे बेल्ट परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा शोतोकाॅन कराटे डो ऑर्गनायझेशन इंडियाचे संस्थापक सिहान अतुल बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सेंसाई रोहित केवारकर, सेंसाई विनोद खोडकुंभे, सेंसाई दिनेश रोकडे, सेम्पाई हेमंत उईके, सेम्पाई हितेश महानुर व इंस्ट्रक्टर गौरव महानुर, गौरी खोडकुंभे, अदिबा चव्हाण यांनी परीक्षा घेतली. या परीक्षेमध्ये एकूण 40 विद्यार्थ्यांना आपले उत्कृष्ठ परिश्रम व मेहनत करून ही बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेमध्ये हिमांशू गोकुल साठे, स्वरीत अनिल खंडारे, प्रज्वल मडावी, नीरज महलगावे, वंश फुटाणे, वैभव मून, कार्तिक घ्यारे व कीर्ती ढोबळे हे विद्यार्थी येलो बेल्ट साठी पात्र ठरले, तसेच ऑरेंज बेल्ट साठी प्रथमेश सुभाष काकड़े, कु.पूर्वी सुभाष काकड़े, कु.अदिती जयानंद ईसाळकर, हितांश संदीप रेकवार, कु.सृष्टी सचिन रेकवार, सर्वेश रवी साहु, जन्मजय उमेश इंगोले, जय कांतेश्वर झुनघरे, युवान प्रशांत जयस्वाल, समर्थ चौधरी, श्रीहरी येमबरवार, सोहम प्रशांत जयस्वाल, कु. संजना ढोबळे, कु.सुमेधा गुप्ता, प्रीतम सोनवणे, स्वर्णेश दिनेश रोकडे व राम तसेच चंदन राऊत ग्रीन बेल्ट साठी तसेच कु.आलिया मोबिन चव्हाण, व कौशल नंदकिशोर येन्नरवार ब्लू बेल्ट साठी व तसेच शिवम पाटणकर, सत्यम पाटणकर, श्रवण निकेश कडूकार व कु.वेदांती चावले पर्पल बेल्ट साठी व तसेच कु. आदिश्री मोहन तेलंग, ओम राहुल कडूकार व पार्थ विनायक पजगाडे ब्राऊन बेल्ट साठी पात्र ठरले. व तसेच यश दरवेकर व तिलक दोमडे ब्लॅक बेल्ट साठी पात्र ठरले. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून कु.अदिती ईसाळकर ला जूनियर बेस्ट स्टुडंट्स अवार्ड व कु. आदिश्री मोहन तेलंग ला सीनियर बेस्ट स्टुडंट्स अवार्ड देण्यात आला तसेच व तिलक दोमडे बेस्ट इन्स्ट्रक्टर अवार्ड देण्यात आला. या विद्यार्थ्यांना सेंसाई रोहित केवारकर (सचिव – शोतोकाॅन कराटे डो असोसिएशन यवतमाळ), सेंसाई विनोद खोडकुंभे(सचिव – कराटे डो असोसिएशन यवतमाळ), सेंसाई दिनेश रोकडे(सचिव – कराटे डो असोसिएशन बाबुळगाव), व हेमंत गणेश उईके(कोषाध्यक्ष – कराटे डो असोसिएशन यवतमाळ) यांचे हस्ते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 21 मे 2023 प्रयासवन यवतमाळ येथे प्रमाणपत्र व बेल्ट देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक रोहित केवारकर, दिनेश रोकडे, अजित मिश्रा, हेमंत उईके व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थ्यांचे कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), ओंकार चेके (जिल्हा अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), प्रवीण दिघाड़े(डायरेक्ट स्केटिंग व कराटे असोसिएशन यवतमाळ), रविन्द्र महानुर व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©