यवतमाळ सामाजिक

संजीवन मध्ये २५ मे रोजी मोफत विविध आरोग्य शिबिर

संजीवन मध्ये २५ मे रोजी मोफत विविध आरोग्य शिबिर

स्थानिक संजीवन हॉस्पिटलच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुरुवार २५ मे २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान मोफत विविध आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला प्रसूती तपासणी, स्तन कर्करोग, दंत, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन, फुफ्फुस तपासणी, डोळे, मुत्ररोग, किडनी रोग, हाडातील कॅल्शियम, नाक कान घसा, डायबेटिस रुग्णांना होणाऱ्या पायाच्या आजाराची तपासणी, पाईल्स, फिस्टूला मूळव्याध, हृदयरोग आदी आजारांची तपासणी मोफत केली जाणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. थायरॉईड तपासणी साठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. महिला प्रसूती आणि समस्या शिबिर बिपिएल धारकांसाठी आहे. प्रवेश मर्यादा असल्यामुळे इच्छुकांनी आपल्या नावाची नोंदणी संजीवन हॉस्पिटल मध्ये २४ मे पर्यंत सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत करावी. सदर तपासणी नामवंत डॉक्टर्स करणार असून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संजीवन हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ सुनील अग्रवाल यांनी केले आहे.

Copyright ©