महाराष्ट्र राजकीय

गडकरीने केले ट्रेनिंग सेंटरचे निरीक्षण

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

गडकरीने केले ट्रेनिंग सेंटरचे निरीक्षण

संबंधित अधिकाऱ्यांना दिले दिशा निर्देश

देवळी तालुक्यातील ईसापुर येथील बनत असलेले विभागीय ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर ला केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी संध्याकाळी ६ वाजता भेट दिली. याप्रसंगी खा.रामदास तडस,आ. अशोक उईके,आ रामदास आंबटकर, उदय मेघे,पोलीस अधीक्षक नुरुल हसन,भाजपा नेते राजेश बकाने, डॉ नरेंद्र मदनकर,सरपंच सुधीर बोबडे,तसेच बीजेपी चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विभागीय ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरचे निरक्षण करून संबंधित अधिकाऱ्यांना दिशा निर्देश दिले.या ठिकाणी खा.रामदास तडस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वर्धा जिल्ह्यातील १० प्रमुख सडक रस्त्याची विकासासंबंधीत निवेदन दिले.हे काम सन २०२३-२४ मध्ये प्रस्तावित केले आहे.यामध्ये तळेगाव, आर्वी,पुलगाव,दहेगाव,वर्धा,वाढोणा, आर्वी बायपास,या मुख्य रस्त्यांचा समावेश आहे.सर्वात प्रथम खा. तडस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शाल,पुष्पगुच्छ व गोमातेचे स्मृती चिन्ह भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

Copyright ©