यवतमाळ सामाजिक

सलाम इंडीया पुरस्कारने प्रा.सय्यद सलमान होणार सन्मानीत

सलाम इंडीया पुरस्कारने प्रा.सय्यद सलमान होणार सन्मानीत

पुसद/राष्ट्रीय कार्यकर्तृत्व सन्मान महोत्सव म्हणून देशपातळीवर शैक्षणिक क्षेत्रात जे व्यक्ती निस्वार्थ आपल्या सेवा देत असतात अश्या व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहित करण्याच्या हेतूने सलाम इंडिया अभिमान हा पुरस्कार दिला जातो. त्याच अनुषंगाने दि.२८ मे २०२३ रोजी सकाळी:११ वाजता वाशी,नवी मुबंई येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या व्यक्तीना हा पुरस्कार देण्यात येईल .यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांची निवड करण्यात आली असून त्या निवड प्रक्रियेत यवतमाळ जिल्ह्यातील जे नेहमीच शैक्षणिक व सामाजिक कार्यात तत्पर असता असे पुसद तालुक्यातील प्रा.सय्यद सलमान सै.शेरु हे सन्मानित होणार आहेत.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून सलमान सर विशेषतः स्पर्धा परीक्षा आणि मराठी भाषा यामध्ये खूप उल्लेखनीय कार्य करत आहे.आणि विशेष म्हजणे आपल्या युवा अवस्थेत सरांनी अश्या प्रकारचे शैक्षणिकव सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या कल्याणासाठी करत आहे यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येत आहे.

Copyright ©