महाराष्ट्र सामाजिक

वनविभागाच्या जमिनीवरील वृक्षांची अवैध्य कटाई

देवळी ता.प्रतिनिधी:सागर झोरे

वनविभागाच्या जमिनीवरील वृक्षांची अवैध्य कटाई

वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हेतू परस्पर दुर्लक्ष,

देवळी तालुक्यातील वाफगाव या गाव शिवाराला लागून असलेल्या वन विभागाच्या हद्दीतील बाबुळगाव पांदण रस्ता येथील वन विभागाच्या ताब्यातील ९ ऐकर जागेमधील वृक्षांची अवैध कटाई करण्यात आलेली आहे. याप्रकरणी गावातील नागरिकांनी वन विभागाला सूचना पण दिली आहे परंतु वन विभाग अधिकारी तेथे आले त्यांनी त्या जागेची पाहणी केली व अवैध्य वृक्षतोड झाल्याची त्यांच्या पाहणीत निष्पन्न झाले परंतु अवैध वृक्ष कटाई करणाऱ्यांवर कोणती कारवाई झाली हे सांगण्यात वन विभाग अधिकारी टाळाटाळ करीत आहे.या वाफगाव च्या अवैध्य वृक्षतोडीविषयी वन विभाग अधिकारी क्षेत्र सहाय्यक देवळी पुलगाव गिरीश गायकवाड यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधून या प्रकरणाविषयी विचारले असता त्यांनी कोणती कारवाई केली याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केली आता विन वन विभागाचे अधिकारी या प्रकरणात कोणती कारवाई करते याकडे त्या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Copyright ©