महाराष्ट्र सामाजिक

देवळी बैल बाजारात सोई सुविधांचे अभाव

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

देवळी बैल बाजारात सोई सुविधांचे अभाव

कृषी उत्पन्न बाजार समिती देवळी बैल बाजाराच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

गुरे देवाणघेवाण करणाऱ्यांना सहन करावा लागतो असहनिय त्रास

देवळीतील बैलबाजाराची तुलना वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठा बैल बाजारा म्हणून केली जाते.हा बैल बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारामध्ये दर शनिवारी भरविल्या जात असतो या बैल बाजाराच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती लाखो रुपयांचा गुरांच्या विक्री उत्पन्न घेतो आणि या बैल बाजाराच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समिती देवळीवर आहे.

परंतु या बैल बाजारा मध्ये गुरांची देवाण-घेवाण करणाऱ्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या गुरांसोबत रणरणत्या मे महिन्याच्या कडक उन्हात त्यांना उभे राहावे लागतात त्यामुळे अनेक देवाणघेवाण करणाऱ्यांची प्रकृती खालवली आहे. तसेच या बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे गुरांची देवाण-घेवाण करणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची शेडची व्यवस्था केलेली नाही.तसेच मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांसाठी पेय जलांची ही धड व्यवस्था केलेली दिसत नाही.व गुरांना पाणी पिण्यासाठी एक टाका बांधलेला आहे त्याच्यावरही कुठल्याही प्रकारची शेड नाही मे महिन्याच्या उन्हामध्ये त्या टाक्यातील पाणी चांगलेच गरम होतो की गुरे ही ते पाणी पिऊ शकत नाही बाजारामध्ये येणारे लोक सोबत कापडांचे पाल बांधून त्याच्यामध्ये बसतात काही तर उन्हाचा बचाव करण्यासाठी बैलबंडीच्या खाली आश्रेय घेतात.

लाखो रुपये वार्षिक उत्पन्न मिळूनही कृषी उत्पन्न बाजार समिती देवळी हेतू परस्पर या बाजाराच्या सोयी सुविधे कडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बाजारत येऊन देवान घेवाण करणारे व व्यापारी व शेतकरी वर्ग करीत आहे.जर कृषी उत्पन्न बाजार समितीने या बैल बाजाराकडे लक्ष दिले नाही तर हा बाजार नामाशेष झाल्याशिवाय राहणार नाही असे सूर लोकांमध्ये उमटू लागले आहे.विशेष म्हणजे या कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील अनेक वर्षापासून काँग्रेस समर्थित गटाची सत्ता आहे तरीही या बैल बाजारांची हलाखिची परिस्थिती दूर झालेली नाही असे दिसून येते.

Copyright ©