यवतमाळ सामाजिक

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

हिंदू धर्मासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती दिनांक १४ मे रोजी दिग्रस शहरातील छत्रपती संभाजी नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची रीघ लागल्याचे यावेळी दिसून आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ जय भवानी जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांनी संभाजी नगर दुमदुमले होते.

छत्रपती संभाजी महाराज हे सकल हिंदू समाजाचे आदर्श होत. त्यांच्या बलिदानामुळे आज हिंदू धर्म टिकून आहे. त्यांच्यावर अतोनात अत्याचार झाले. मात्र धर्मवीर संभाजीराजे यांनी नमते घेतले नाही. त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. यावेळी हिंदू समाजातील लोकांसोबत महिला व बालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहासातील काही प्रसंग कथन केले. संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षांमध्ये जो पराक्रम गाजवून अतुलनीय कामगिरी बजावली व स्वराज्यासाठी, धर्मासाठी सर्वोच्च बलिदान केले, त्याचा उल्लेख करून सर्वांनी अभिवादन केले. यावेळी शैलेश जाधव,कुणाल खाणझोडे,कपिल कटकोजवार,सुमित बेंकर,मोहन गंध्रे,महेश चव्हाण,अजय काळबांडे,शुभम मंगळे,विजय नरळे,अमोल नरळे,गणेश बाबर,ओंकार मोरे,दुर्गेश साळुंखे,प्रज्वल इंगोले,ओम बाबर,अनिकेत नरळे,वैभव चव्हाण,गौरव गव्हाणे,गौतम बरडे,रिंकू शिंदे,जय सलगर,लखन मोरे व ईतर अनेक शिव भक्त उपस्थित होते

Copyright ©