Breaking News यवतमाळ

ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हनुण सरपंचाने केली युवकाला मारहाण

ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हनुण सरपंचाने केली युवकाला मारहाण

यवतमाळ तालुक्यात असलेले तिवसा हे गाव नेहमीच कोणत्यानी कोणत्या बाबींकरिता प्रचलित असतेच अशीच एक गंभीर घटना म्हणजे दि.१८ मे २०२३ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सरपंच नरेश वामन राठोड यांना हिशोब मागणे हे एका युवकांच्या जीवावर येवुन बेतले आहे.

सविस्तर वृत्त म्हणजे तिवसा येथे आयोजित ग्रामसभेमध्ये गावातील सुशिक्षित युवक कुमार बाळासाहेब चव्हान याने सरपंचाने केलेल्या भ्रष्टाचारावर आवाज उठवला तसेच जनतेसमोर प्रश्न उपस्थित केले त्यादरम्यान सरपंच महाशय प्रश्नाचे उत्तर न देता भरसभेमधून पसार झाले याचाच वचपा काढणे करिता आज दि.१९ मे २०२३ रोजी सरपंच नरेश वामन राठोड याने कुमार चव्हान यांना फोन करुन यवतमाळ येथे हिशोब देतो असे म्हणून बोलविले.कुमार यवतमाळ येथे पोहचताच त्याला ओम्नी व्हॅन(अॅबुलंस)मध्ये गोधनी रोड कडे सात ते आठ कुख्यात गुंडाना सोबत घेवुन कुमार ला डांबून नेले.कुमार चव्हान तिथे पोहचताच सरपंच महाशय व त्यांचे सहकारी यांनी मिळुन सदर युवकाला जीवेनीशी संपवण्याचा कटच रचलेला होता.गोधनी रोड वर पोहचताच गाडी थांबवून सरपंच नरेश राठोड याने कॉलर पकडून कुमार मारहाण करु लागले सोबतच त्यांचे सहकारी राजेश विष्णु राठोड यानी लाठया-काठ्यांचा उपयोग करुन बेदम मारहाणीला सुरुवात केली.ओम् नी वाहना मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा दिसल्याने कुमार ने त्याने मित्र निलेश किशोर राठोड यांना फोन करुन जीव धोक्यात असल्याचे कळविले.घटनास्थळी निलेश दाखल होताच सरपंच नरेश वामन राठोड व गुंडाची टोळी घटना स्थळावरुन पसार झाली.कुमार चा जीव थोडक्यात वाचला.

संपुर्ण घटनेचा तक्रार अवधूतवाडी पोलिस स्टेशन येथे दिले असुन पुढिल तपास गुजर करीत आहे.

Copyright ©