यवतमाळ सामाजिक

सोनखास (हेटी) येथील गवळी समाजाचा मुलगा “विनोद धराडे” याची पोलिस भरतीत निवड”

सोनखास (हेटी) येथील गवळी समाजाचा मुलगा “विनोद धराडे” याची पोलिस भरतीत निवड”

“यवतमाळ पासून 20 की.मी. अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील मुला-मुलींचे शिक्षण म्हणजे कोरड्या विहिरीतून पाणी काढणे. त्यात गवळी समाज भटका. मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते ही परिस्थिती.आई-वडील म्हशीचा व्यवसाय. मोडकळीस आलेली घर अन दगड, दराडीवर असलेले घर अशा विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणे एक दिव्य स्वप्न.

अशा बिकट परिस्थितीत विनोद वासुदेव धराडे या समाजातील मुलाने शिकण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेतली. अत्यंत प्रतिकूल आणि हालाखीची परिस्थिती, मिळेल ती कामे करणे. विद्युत पुरवठा नाही त्यामुळे रात्रीला दिव्याच्या उजेडात अभ्यास करून त्याने हे यश मिळवले. या मेहनतीचे फळ त्याला पोलिस भरतीत निवड झाल्यामुळे मिळाले. १२ वी नंतर पोलिस भरतीसाठी तयारी केली आणि त्याने यश खेचून आणले.

विनोद धराडे या मुलाच्या यशामुळे गावोगाव फिरून उदरनिर्वाह करणाऱ्या गवळी समाजातील मुला-मुलींना शासकीय नोकरी मिळू शकते हा विश्वास निर्माण झाला. आज सर्व समाज बांधवांनी त्याच्या घरी जाऊन विनोद धराडे, त्याचे वडील वासुदेव धराडे, आई सौ. कलाबाई धराडे यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. विनोद धराडे यांनी या यशाचे श्रेय आपले आईवडील, शिक्षक, व समाज बांधवांना दिले आहे. समाजातील मुला-मुलींनी अशीच प्रगती करावी अशी इच्छा त्याने सर्व समाज बांधवांसमोर व्यक्त केली. यावेळी सोनखास हेटी येथील सरपंच श्रावण कालोकार गवळी समाजाचे कार्यकर्ते मा. सुधाकर डोळे, मा. ओंकार चेके, मा. ऊन्हाळे गुरुजी, मा. पंडितराव बोपटे, बळवंतराव धराडे, छगन धराडे, बळवंतराव अरबट, प्रभाकर झामरे, अमृतराव डोळे, गुणवंतराव धराडे, भगवान झामरे, नंदु धराडे, धनराज धराडे, किशोर झामरे, इत्यादी मान्यवर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Copyright ©