राजकीय सामाजिक

पंजाबराव डख 2023 चा मान्सून अंदाज – मे महिन्यात असं राहील वातावरण

पंजाबराव डख 2023 चा मान्सून अंदाज – मे महिन्यात असं राहील वातावरण

मान्सूनचे आगमन 1 जून 2023 रोजी महाराष्ट्रात होणार असल्याचा अंदाज आहे. 1 जूनला राज्यात पावसाला सुरुवात होणार असून हा पाऊस मान्सूनचा राहणार आहे. 1 जून ते 3 जून दरम्यान राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.

निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही माहिती अतिशय महत्त्वाची असून मान्सूनचे वेळेआधी होणारे आगमन यंदाही मान्सून दमदार राहणार असल्याचे संकेत आहेत. एकंदरीत खरीप हंगामाची पूर्वतयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

मे महिन्यात कसं राहणार हवामान

दरम्यान मे महिन्यात 20 मे 2023 पर्यंत तापमानात वाढ कायम राहणार आहे. तसेच या कालावधीमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तापमान 45 अंश डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक राहण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे.

20 मे नंतर मात्र वातावरणात बदल होणार असून 21 मे ते 23 मे दरम्यान राज्यातील काही भागात भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो, असा अंदाज आहे.

Copyright ©