Breaking News यवतमाळ

तिवसा ग्रा.प.अनोखा गैरप्रकार जनेनेते विचारले जाब,तर सभादरम्यान सरपंचच झाले फरार

तिवसा ग्रा.प.अनोखा गैरप्रकार जनेनेते विचारले जाब,तर सभादरम्यान सरपंचच झाले फरार

तिवसा:- यवतमाळ तालुकाअंतर्गत मौजा तिवसा या गावामध्ये एक आगळा-वेगळा प्रकार घडून आल्याचे निदर्शनास येते आहे.दि.१८\०५\२०२३ रोजी ११.०० वा.ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते,ग्रामसभेमध्ये सर्व सामन्य जनतेला आपपाले प्रश्न मांडण्याचा अधिकार असुन सरपंच सबब प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील असतात असे असताना तिवसा येथील सर्वसामान्य जनतेने गावाच्या विकासकामाची यादी व हिशोब मागितल्यास सरपंच यांची तारांबळ उडाली,मागील कार्यकाळा मध्ये सरपंच नरेश वामन राठोड हे आपली मनमानी कारभार तसेच भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार त्यांचेच ऊपसरपंच अभिजीत राठोड व ग्रा.प.सदस्य सुभाष चव्हान यांनी वरिष्ट अधिकार्याकडे तक्रार केलेली होती परंतु सरपंच नरेश वामन राठोड यांचे ग्रा.प.तिवसा मधील गैरव्यवहार थांबताना दिसले नाही त्यांच्या ह्या मनमानी कारभारला आळा सुद्धा आधिकारीनी घातलेला दिसत नाही.

तसेच ग्रामसभेदरम्यान उपस्थित असलेल्या जनतेने जाब विचारला व सरपंच याने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत विचारणा केली असताच अध्यक्ष महोदयानी भर सभेत खुर्चीवरुनच पळ काढला.

या संपूर्ण घटनेचा संपुर्ण गाकर्यानी निषेध नोंदवला तसेच उपसरपंच ग्रा.पं.सदस्य सोबतच गावकरी मंडळीनी मिळुन गटविकास अधिकारी पं.स.यवतमाळ गाठुन सरपंच तसेच सचिव यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई व ग्रामसभा पुन्हा होणेकरीता उपसरपंच अभिजीत राठोड,सुभाष चव्हान,ग्रा.प.सदस्य,सचिन राठोड,दुर्गादास राठोड,राजेश चव्हान,संतोष चव्हान,हरिष राठोड,रमेश राठोड,श्याम जाधव,महेश पवार, जीत पवार आदीनी उपस्थित राहुन निवेदन दिले.

Copyright ©