Breaking News यवतमाळ

घरफोडीत सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास

घरफोडीत सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास

यवतमाळ : घराचा कोंडा काढून आत प्रवेश करीत आलमारीतील सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख असा एकूण तीन लाख ३२ हजार तीन रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना कळंब तालुक्यातील जोडमोहा येथे १२ मे रोजी ८.३० वाजता उघडकीस आली. निरंजन वसंता रामटेके (३४) रा. जोडमोहा असे फिर्यादीचे तर अविनाश रमेश खेडके (२९) अधिक एक दोन्ही रा. जोडमोहा अशी संशयितांची नावे आहेत. यातील संशयितांनी संगणमत करून फिर्यादीच्या राहत्या घराचा कोंडा काढला. आत शिरून आलमारीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने किंमत दोन लाख ३२ हजार तीन रुपये व नगदी एक लाख असा एकूण तीन लाख ३२ हजार तीन रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार रामटेके यांनी दिली. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हे नोंद केले आहे.

Copyright ©