Breaking News यवतमाळ

रुग्णाची खुले आम् होत आहे विक्री

रुग्णाची खुले आम् होत आहे विक्री

डॉक्टर व रुग्णवाहिका चांलकाचे रॅकेट सक्रिय.

नागपुरातील डॉक्टरांच्या सतत यवतमाळला भेटी रुग्णवाहिका चालकांना दिल्या जात आहे ओल्या पार्ट्या

खाजगी तथा शासकीय रुग्णालयात मेंदू वर उपचार करणारे तज्ञ नसल्याने नागपूर येथील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर तसेच यवतमाळ येथील खाजगी रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांची चक्क खरीदी विक्री सुरु केलेली आहे.रुग्णांच्या खरीदी विक्रीचा गोरखधंदा गेल्या काही वर्षापासून सुरु असून यावर अंकुश लावण्यासाठी कोणतेही अधिकारी पुढे येत नसल्याने हा गोरखधंदा सारखा वाढतीवर असल्याचे दिसून येत आहे.या पूर्वी डॉक्टरांना वाचणाऱ्या पैश्यात रुग्णवाहिका चालकांना 30 टक्के कमिशन दिल्या जात होते परंतु आता मात्र मेडिसिन मध्ये पण रुग्णवाहीका चालकांना 30 टक्के कमिशन दिल्या जाणार असल्याचे दिनांक 16 मे 2023 रोजी सायंकाळी नागपूर येथून आलेल्या डॉक्टरांनी यवतमाळ मधील नागपूर रोडवर एका धाब्यावर झालेल्या ओल्या पार्टी मध्ये रुग्णवाहिका चालकांशी करार केलेल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.तसेच रुग्णाला त्यांच्या रुग्णालयात सोडताच 10.000 हजार रुपये टेबल कॅश देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले त्या मुळे रुग्णाचे जीवन धोक्यात आले आहे रुग्णाची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केल्या जात आहे.

या रॅकेट चां लवकरच छडा लावून भविष्यात होणारी लूट थांबविण्यात यावी अशी मागणी केल्या जात आहे.

Copyright ©