यवतमाळ सामाजिक

महावीर इंटरनॅशनल ची कार्यकारिणी नव्याने गठीत करुन सामाजिक उपक्रम राबविणार : नवनियुक्त विदर्भ झोन सचिव प्रविण निमोदिया

महावीर इंटरनॅशनल ची कार्यकारिणी नव्याने गठीत करुन सामाजिक उपक्रम राबविणार : नवनियुक्त विदर्भ झोन सचिव प्रविण निमोदिया

यवतमाळ – येथील टिंबर मर्चंट असोसिएशनचे सचिव व शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख प्रविण निमोदिया यांची महावीर इंटरनॅशनल विदर्भ झोन सचिवपदी झोप चेअरमन वीरा सुनीता सुराणा यांनी एका पत्रकाद्वारे नियुक्ती केली आहे.

श्री प्रविण निमोदिया यांनी महावीर इंटरनॅशनल च्या माध्यमातून यवतमाळ शहरामध्ये २००८ पासून विविध सामाजिक उपक्रम नियमितपणे राबवित असून रक्तदान शिबीर, जयपुर फुट अन्नदान विविध आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, शैक्षणिक उपक्रम तसेच राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेवून महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्राला बळकटी दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रविण निमोदिया यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय महावीर इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अनिल जैन (दिल्ली), उपाध्यक्ष तरुण सुराणा, माजी उपाध्यक्ष सोहन वैद्य व दिलीप भंडारी यांना दिले आहे.

आपले पदभार सांभाळतांना महावीर इंटरनॅशनल चे विदर्भ झोन सचिन प्रविण निमोदिया यांनी संस्थेच्या स्वर्ण महोत्सवानिमित्त यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला असून लवकरच यवतमाळ जिल्ह्यातील महावीर इंटरनॅशनल यवतमाळ शाखेची नुतन कार्यकारीणी कठीत करुन जिल्ह्यात आगळे-वेगळे उपक्रम राबविण्याचे अभिवचन दिले आहे.

Copyright ©