महाराष्ट्र सामाजिक

वर्धा जिल्ह्यातील हज यात्रेकरुचे प्रशिक्षण १७ मे ला

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

वर्धा जिल्ह्यातील हज यात्रेकरुचे प्रशिक्षण १७ मे ला

हज यात्रेकरूचे टीका करण होणार २१ मे ला

मुस्लिम समाजामध्ये हज यात्रेचे महत्व फार मोठे आहे जीवनात तरी एकदा सुद्धा हज यात्रेला जायचे प्रत्येक मुस्लिम समाजातील लोकांची इच्छा असते.

या वर्षी २८ जूनला सौदी अरेबियातील मक्का या ठिकाणी हज संपन्न होईल याकरिता आपल्या वर्धा जिल्ह्यातून ३६ हज यात्रेकरू हज यात्रेवर जाणार आहे त्यामध्ये देवळी तालुक्यातील हज यात्रेकरूचेही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे या हज यात्रेचे प्रशिक्षण सकाळी १०ते ५पर्यंत शिबिर १७ मे रोजी साई मंगल कार्यालय एस पी ऑफीस जवळ वर्धा येथे संपन्न होणार आहे तसेच २१ मे रोजी हज यात्रे करुचे शासकीय रुग्णालय वर्धा येथे टीका करण करण्यात येईल.या कार्यक्रमाचे आयोजन खादी-उल हुज्जाज कमेटी वर्धा तर्फे करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमाच्या सफलतात मुक्ती मुजमिल खान,हाजी सोहराब तूरक, हाजी तौफिक मुसामी,अकमल शेख,अशरफ अली,इत्यादि प्रयत्न करीत आहे.

Copyright ©