महाराष्ट्र सामाजिक

शिरपूर ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत प्रथम पुरस्काराने सन्मानित

देवळी ता.प्रतीनीधी:सागर झोरे

शिरपूर ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत प्रथम पुरस्काराने सन्मानित

देवळी तालुक्यातील शिरपूर होरे ग्रामपंचायतला जिल्हा परिषद वर्धा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2019 – 20 मध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल व उत्कृष्ट प्रभाग मधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे .

तसेच या ग्रामपंचायतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन पुरस्कार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत शिरपूर चे सरपंच रवींद्र भानारकर व सचिव प्रविण चव्हाण यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व ग्रामगीता देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व रोहन घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाजिल्हा परिषद वर्धा यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल भोसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मेसरे साहेब वाघ साहेब आदींची उपस्थिती होते .या प्रसंगी रवींद्र भानारकर सरपंच यांनी स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाला याकरिता मला सर्वप्रथम गावकरी गावकरी व उपसरपंच ग्रा.प सदस्य व कर्मचारी वुंद तसेच शाळेचे शिक्षक यानी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच हा पुरस्कार आपण प्राप्त करू शकलो तसेच तसेच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सुद्धा आभार मानतो

यापूर्वी या ग्रामपंचायलाशिरपूरला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घटकांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच विविध योजनांच्या माध्यमातून शिरपूर गावाचा विकासाचे कामाची वाटचाल सुरू असून या गावाला आदर्श गाव करण्याचा मानस असल्याचे सरपंच यांनी सांगितले . या गाव विकासाकरिता प्राधान्याने प्रथमताशिरपूर वाशी व उपसरपंच राधा लडके प्रणाली चौधरी नीता जांभुळकर अर्पिता ठाकरे सारिका महाडिक नरेश पाटील अमोल गुल्हाने शुभम पाटील निखिल गुल्हाने ग्रामसदस्य व कर्मचारी तसेच जि प शाळेतील शिक्षक वृंद व अंगणवाडी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले संचालन विनोद खोब्रागडे तर आभार साधना पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पा पू व. स्व. जि.प. वर्धा यांनी केले .

Copyright ©