यवतमाळ

हर्ष आनंद पसारीचे उज्वल यश

हर्ष आनंद पसारीचे उज्वल यश

यवतमाळ – येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स चा विद्यार्थी हर्ष आनंद पसारी याने सि.बी.एस.ई. दहावीच्या परिक्षेत ९६.४० टक्के गुण घेऊन उज्वल यश संपादन केले आहे. त्याने शाळेतून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. नियमितपणे अभ्यास व प्रश्‍नपत्रीकेचा नियमित सराव यामुळे उज्वल यश त्याने संपादन केले असल्याचे सांगितले. त्याला खेळण्याचा व वाचनाचा छंद होता. त्याच्या या उज्वल यशाबद्दल अग्रवाल समाजात तसेच यवतमाल का राजा सेवा परिवाराच्या वतीने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र सिंह चव्हाण, उपमुख्याध्यापीका रिना काळे, प्रशासकीय अधिकारी कुणाल वाघमारे, भैरव मुंजाल यांना दिले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©