यवतमाळ सामाजिक

टीडीआरफ च्यां वतीने वासुदेव जाधव यांना उत्कृष्ट उपसरपंच पुरस्काराणे सन्मानित

टीडीआरफ च्यां वतीने वासुदेव जाधव यांना उत्कृष्ट उपसरपंच पुरस्काराणे सन्मानित

टीडीआरफ वर्धापन /स्थापना दिवसानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट व निस्वार्थ कार्य करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या कार्यासाठी सेवा कार्य पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी उत्कृष्ट सरपंच उपसरपंच या क्षेत्रातून ग्रामपंचायत चांदापूरचे उपसरपंच वासुदेव रतन जाधव यांची टीडीआरफ च्या वतीने निवड करून त्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे व टीडीआरफ संचालक हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांच्या हस्ते उत्कृष्ट उपसरपंच पुरस्कार मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. टीडीआरफ

संचालक यांनी यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, “उपसरपंच वासुदेव जाधव हे एक कर्तव्यनिष्ठ, सर्वधर्म समभाव हा विषय घेऊन गावाचा विकास करणारे, युवकांना प्रेरित करणारे व गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारे तसेच आपले गाव आदर्श गाव बनावे असे दूरदृष्टी ठेऊन समाजसेवा करणारे उपसरपंच यांचे कार्य कौतुकास्पद आहे”

Copyright ©