महाराष्ट्र सामाजिक

शेतकरी नरेश ढोकणे यांनी केले १००वेळा रक्तदान.

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

शेतकरी नरेश ढोकणे यांनी केले १००वेळा रक्तदान.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे,शेतकरी ढोकणे यांनी केले लोकांना आव्हान

देवळी तालुक्यातील ईसापुर या गावातील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश ढोकणे यांनी वयाच्या २२व्या वर्षापासून रक्तदान करण्याची सुरुवात केली आतापर्यंत तब्बल१०० वेळा त्यांनी रक्तदान केलेले आहे.या रक्तदानामुळे अनेक महिलांचे व पुरुषांचे प्राण वाचले आहे त्यांच्या या कार्याला सर्व सामाजिक स्तरातून त्यांना गौरविण्यात येत आहे.
नरेश ढोकणे यांचा मुख्य व्यवसाय हा शेती तसेच पशुपालनाचा व्यवसाय आहे ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्येही काम करतात आणि कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे मागील १५ वर्षापासून सल्लागार समितिचे सदस्य होते.मागे १२ देशातून भारतीय शेतीवर रिसर्च करण्यासाठी आलेल्या विदेशी पाहुण्यांसोबत ईसापुर येथे संवाद साधून भारतीय शेतीतील तंत्रज्ञ यावर त्यांच्यासोबत संवाद साधला तसे अनेक सामाजिक कार्यामध्ये ते सहभागी असतात.
१०० वेळा रक्तदान करून सुद्धा त्यांची शरीर प्रकृती अजूनही टनक आहे. त्यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपल्या परिवारासाठी प्रत्येक माणूस जगत असतो दुसऱ्याच्या परिवार वाचवन्यात जो आनंद आहे तो कोणत्याच देवभक्तीत नाही तसेच त्यांनी लोकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले आहे.

Copyright ©