Breaking News

बजरंग दलाकडून हिंदू महिला व तरुणींकरिता ‘दि केरला स्टोरी’ चित्रपटाचे दोन दिवस मोफत आयोजन

 

दिग्रस (प्रतिनिधी)

लव्ह जिहाद सारख्या घातक परिणामावर आधारित असलेल्या ‘दि केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दोन दिवसीय निःशुल्क आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखा- दिग्रसच्या वतीने करण्यात आले असून हिंदू माता-भगिनींनी हा चित्रपट आवर्जून पाहावे, असे आवाहन बजरंग दलच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील शंकर टॉकीज येथे दि. १३ व १४ मे शनिवार आणि रविवारी रोजी हा चित्रपट हिंदू महिला आणि तरुणींना मोफत दाखविन्यात येणार आहे.

सध्या देशभर ‘दि केरला स्टोरी’ हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. काही राज्यांनी या चित्रपटाला विरोध करत बंदी घातली आहे. तर काही राज्याने हा चित्रपट करमुक्त केला आहे तरी देखील हा चित्रपट चांगली कमाई करत असल्याचे दिसून येत आहे. निव्वळ हिंदू मुलींना टारगेट करून विशिष्ट धर्मीय मुलांकडून लव्ह जिहादसारख्या कृती घडवून आणल्या जात आहे. हिंदू समाजामध्ये जनजागृती व्हावी, हिंदू तरुणी या बाबीला बळी पडू नये, याकरिता बजरंग दलने मोफत चित्रपट दाखविण्याचे आयोजन केले आहे. तरी हिंदू धर्मातील महिला, तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन चित्रपट पाहावा व बोध घ्यावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल दिग्रस शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Copyright ©