Breaking News

बाणायत येथील दलित अल्पवयीन मुलीचा डोका येथे मृत्यु प्रकरनी अखेर । केज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .

 

लाडखेड प्रतिनिधी : प्रदीप मेश्राम .

विदभीतील अल्पवयीन मुलीचा मराठवाड्या मधील
बीड जिल्या मधील केज तालुक्यातील डोका या गावी
मयत कु वर्षा हिचा दि . 4 . मे . 23 . ला विहीरीत मृता अवस्थेत मृतदेह आढळून आला .
या प्रकरनी केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला . मृतक वर्षी ही तिचे आई वडील यांचे सोबत कर्नाटक मध्ये दसऱ्यालाच उसतोडनी साठी गेली होती . तेव्हा आरोपी सुशील संपत भांगे याचे कामावर काम करित होते . याच ओळखीचा फायदा घेत सुशील भांगे याने . मृतक वर्षा ही तिच्या बहीणी कडे गेली असता सुशील भांगे याने मृतक वर्षा हिस तिच्या विवाहित बहिणीच्या घरून चिंचोली . ता . दिग्रस . जि यवतमाळ येथुन फुस लावून डोका . ता . केज जि . बीड येथे पळवुन आनले . ती अल्पवयीन व अनुसुचित जातीची असल्याचे माहित असतांना तिच्यावर बळजबरीने वारंवार बलात्कार केला आणि तिला मारहान व शिवीगाळ करून तिला त्रास दिला त्यामुळे त्या अल्पवयीन मुलीने दि . 4 . मे रोजी त्रासाला कंटाळुन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली . अशा तक्रारीवरून सुशिल भांगे याच्या विरुद्ध . गु . र . न . 253 / २० 23 . भा . द वि . 306 . 376 . [ 2 ] [ एन ] 323 . 504 . बालकांचे लैगीक शोषन व अत्याचार सरंक्षण कायदा 2022 चे कलम 4 आनि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला . गुन्हा दाखल झाल्या नंतर केज पोलीसांनी सुशील संपत भांगे याला अटक करण्यात आली . . तसेच आरोपीला सत्र न्यायालयाने 10 मे पर्यन्त पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली . या प्रकरनी पोलीस उपनिरिक्षक वैभव सार हे पुढील तपास करित आहे .

  • अल्पवयीन मुलीच्या मृत्यु प्रकरनी लहुजी शक्ती सेनेचे प्रियंकाताई लांडगे आणि कार्यकतै आक्रमक झाले होते त्यामुळे जमावाला काबुत आनण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला . 

दोन दिवसा पासुन मृतदेह शवगृहात .

गुन्हा दाखल होई पर्यन्त शवीवछेदन करण्यात येवु नये अशी भुमीका नातेवाईकांनी घेतल्या मुळे दि 4 मे पासून दि . 6 मे पर्यन्त दोन दिवस प्रेत केज उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले होते . त्या नंतर दि . 6 मे रोजी गुन्हा दाखल झाल्या नंतर शवविच्छेदन करून . त्याच ठिकानी केज येथेच स्मशान भुमीत मृतक वर्षा हिचा अंतिम संस्कार अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये करण्यात आला .

पत्रकार शक्तीशी बोलतांना मृतक वर्षी हिचे आई वडिल यांनी सांगीतले की . माझ्या मुलीच्या मृत्यु ला जबाबदार सुशिल चंपत भांगे च हा नराधाम जबाबदार असुन . ह्याने माझी मोठी मुलगी हिचे घरून फुस लावून चिंचोली दिग्रस येथुन पळून नेले . व तिला जबरदस्तीने घरी घेवुन गेला आणि काहि दिवसाने या नराधामारे फोन करून सांगीतले की तुमची मुलगी माझेच घरी आहे . नंतर मुलीनेही आई वडील यांना फोन करून सांगीतले की मला सुशील हा माझा शारिरीक आणि माणसिक छळ करित आहे मला घरी घेऊन जा असे सांगीतले होते . परंतु मृतक वर्षा हिला आईवडीलांनी घरी घेवून येण्या आधिच आपल्या जिवाला मुकावे लागले .

– तसेच केज पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला नाही . अशी माहिती मृतक हिचे आईवडिलांनी पत्रकार शक्तीशी बोलतांना सांगीतली

Copyright ©