Breaking News यवतमाळ सामाजिक

यवताळमधील पक्ष्यांना ओलावा पशुप्रेमी संस्थेचां मायेचां ओलावा.

५०० पेक्षा अधिक विवध झाडांवर लावलित पक्ष्यांना राहण्याकरिता घरटी..
प्रतिनिधी
यवतमाळ शहरातील मोकाट प्रण्यान प्रेमाने पक्ष्यांचा पण भरपुर समस्या आहते. शहरतील शहरीकरण हे दिवसेंदिवस वाढतच जात आहे त्यामुळे पाहिले दिसणारे पक्षी जसे चिमणी कावळे हे क्वचितच पाहायला मिळतात. शहरीकरण वाढत आल्याने जंगल झाडे नष्ट होत चालेली आहे. त्यामुळे या पक्ष्यांचां आसरा सुध्दा नाहिस्सा होतो आहे. पावसाळ्यात बहुतांश पक्षी हे पिल्लं देतात, पण जोऱ्यात वाऱ्याने पावसाने त्यांनी बनवलेली घरटी ही खाली पडतात. घरटी खाली पडल्याने पक्ष्यांची पिल्लं , पक्षी मरतात.

आता या पक्ष्यांचे काय? ऊन वारा आणि पाऊस याचा बचावकरिता काही या करिता ओलावा पशुप्रेमी संस्थेने विचार केला की अशा पक्ष्यांन करिता काही तरी करायला हवं ज्याने करून ऊन वारा आणि पाऊस या पासून पक्ष्यांचे सरक्षण झाले पाहिजे. ओलावा पशुप्रेमी संस्थेतील एका समाजसेवकाने ( सचिन गिरी ) एक कल्पना सुचविली की खेडे गावात नदी नाल्याच्या काठावर भोपळ्याचे वेलं लागतात. भोपळा हा आतून पोकळ असतो. सचिन गिरी या समाजसेवकाने त्या आधी तो भोपळा आणून त्याला कापून एक प्रयोग म्हणून घरट बनवून आपल्याच बाहेरील परीसरात लावले १५-२० दिवसाने त्या घरट्यात पक्षी येऊन राहू लागला आणि त्यात पिल्लं सुद्धा दिलेत.

ओलावा पशुप्रेमी संस्थेने यवतमाळ जिल्ह्या जवळील खेडे गावात जाऊन तेथील नदीनाल्यातून भोपळे तोडून आणले. त्या नंतर त्या भोपळ्यानां एका विशिष्ट आकाराचे कापून त्याचे पक्ष्यांन करिता घरटे तयार केले.त्या घरट्यात पाणी राहू नये म्हणुन त्याचा बुडाशी छिद्र करण्यात आले आणि वाऱ्याने घरटे पडू नये या करिता त्याचा आत छिद्र करून ताराणे ते झाडाच्या १५ ते वीस फुटावर लटकविण्यात आले.

ही सर्व घरटी ओलावा पशुप्रेमी संस्थेने नैसगिर्क रित्या बनवलेल्या गेलीआहे जेणे करून त्यात पक्षी सहवास करतील,राहतील.
ही सर्व घरटे यवतमाळ शहरातील जिथे पक्ष्यांचा जास्त वावर आहे किंवा रस्त्याच्या कडेला जे मोठे झाडे आहेत जिथे पक्षी बसतात तिथे हे सर्व घरटी लावण्यात आली. हि घरटी दर्डा प्रेरणास्थळ, प्रयास वण, वाघापुररोड, पाठबंधारे विभाग अशा अनेक ठिकाणी ५०० पेक्षा अधिक झाडांवर घरटी लावण्यांत आली. या उपक्रमात ओलावा पशुप्रेमी संस्थेचे सचिन गिरी , अंकुश खरूले, खुशाल गायकवाड,अरशद खान ,सुजल गोसावी,कार्तिक चौधरी, कपिल टेकाम, स्वप्नील देरे, तेजस भगत, गौरव जोमेवाले, सहभागी होते.

Copyright ©