यवतमाळ सामाजिक

पुजा शेळके यांची महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधी
पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र या सामाजिक व परिवर्तन वादी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात संघटनेची बांधणी सुरू आहे.
याचाच एक भाग म्हणून दि.5 मे 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता यवतमाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र विदर्भ प्रांतअध्यक्ष राजेंद्र लहाने हे होते.
यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या पूजा शेळके यांनी आत्ता पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख ॲड जेबा शेख यांनी पुजा शेळके यांची युवती आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड करून नियुक्तीचे पत्र व्हॉट्सॲपवर पाठवून देण्यात आले.
पूजा शेळके यांच्या निवडी सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Copyright ©