Breaking News यवतमाळ राजकीय सामाजिक

शव्विछेदन गृहात होत असलेला गैर प्रकार न थांबविल्यास ! आम् आदमी पार्टी करणार आंदोलन

 

यवतमाळ:

येथिल स्व. वसंतराव नाईक वैधकिय महाविद्यालय व रुग्णालयात संपूर्ण जिल्हातुन गोर गरीब व सर्वसामान्य नागरिक उपचार घेण्या करिता येतात. उपचार दरम्यान मृत झालेले शव रुग्णालय चे परिसरात असलेले शव्विछेदन केंद्र येथे नेल्या जातो.
या शव विच्छेदन केंद्र येथुन देह नातेवाईक यांना सुपुर्द करण्यात येते , या दरम्यान नातेवाईकाना देह सुपुर्द करण्याकरिता पैसे घेण्यात येते पैसे दिल्यावरच शव देण्यात येतो, हा प्रकार गेल्या अनेक वर्षा पासून सुरू असल्याने शासकीय वसंतराव नाईक महाविद्यालय व रुग्णालय येथे असुन याची दखल घेत आम आदमी पार्टी चे तालुका संयोजक मोबीन शेख यांनी हा प्रकार उघड करीत या प्रकरणात वाचा फोडत या प्रकरणी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या ठिकाणी सतत पैशाची मांगनी,गरीब लोकांना मानसिक त्रास देने हे सर्व प्रकार तातडीने थांबवन्या कारिता आम आदमी पार्टी यवतमाळ चे तालुका अध्यक्ष व इत्तर पदाधिकारी व कार्यकर्ता सह जील्हाधिकारी कार्यालय व रुग्णालय चे अधिक्षक यांच्या कडे निवेदन देऊन होत असलेला गैर प्रकार त्वरित थांबविण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली.
हे सर्व प्रकार तातडीने न थांबविल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा मोबीन शेख़ यांनी दिला.
या वेळी आम आदमी पार्टी यवतमाळ चे जिल्हा अध्यक्ष वसंत राव ढोके यांनी अधीक्षक यांना होत असलेल्या गैर प्रकारा बाबत संपूर्ण घडत असलेल्या घटने बाबत माहिती दिली
या वेळी आम् आदमी
पार्टी चे शहर अध्यक्ष गुणवंत इंदुरकर, जिल्हा कोषाध्यक्ष विलास वाडे, तालुका सचिव कवीश्वर पेंदोर, यवतमाळ जिल्हा यूवा अध्यक्ष आकाश चमेडिया, निरंजन मेश्राम, गोपाल गावंडे, शत्रुघ्न आड़े, सुनंदा पोहनकर, अशोक कारमोर, राजेश धामनकर, सुरजीत सिंह, ऋषि नाथवानी, शुभम मेश्राम, एड. अमित पवार, प्रदीप रीठे , ओम चव्हाण, योगेश बास्तेवार उपस्थीत होते .

Copyright ©