Breaking News यवतमाळ राजकीय

तिवसा ग्रामविविध कार्यकारी सह संस्थेच्या अध्यक्ष पदी अनुप चव्हाण अविरोध

यवतमाळ तालुक्यातील सर्वात मोठी 7 गावाचा समावेश असलेल्या तिवसा सोसायटी च्या अध्यक्ष पदी बोथबोडन येथील अनुप रामचंद्र चव्हाण यांची अविरोध निवड झाली उपाध्यक्ष पदी राजेश आत्माराम राठोड यांची निवड झाली या वेळी संचालक अंकुश डोळे दीपक कतोरे अजय चव्हाण लक्ष्मण नैताम पुरुषोत्तम कांबळे महादेव राठोड शेषराव चव्हाण श्रीराम थोटे नर्मदा राठोड ललिता पवार सुभाष डोळे उपस्थित होते सचिव डोंगरे साहेब चाटे साहेब विरुतकर साहेब सह श्रावण पवार नारायण राठोड चिंतामण पायघन काशिनाथ राठोड प्रवीण पाटील यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तिवसा सोसायटी ला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्व संचालक मंडळाने सहकार्य करण्याचे आव्हान अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केले या वेळी परिसरातील शेतकरी बांधवांनी सुध्दा उपस्थिती लावली

Copyright ©