Breaking News यवतमाळ

कर्ज बाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

कर्ज बाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

यवतमाळ तालुक्यातील पिंपरी पांढुरणा येथील युवा शेतकरी बबलू नारायण राठोड याने सततची नापिकी कर्जबाजारी पणा मुळे सकाळी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली त्याचे वर मध्यवर्ती बँकेचे85हजार व खाजगी कर्ज होते त्याचे कडे साडे चार एकर शेती असून दोन वर्षांपूर्वी आजारपण मुळे आई आणि वडील दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण परिवाराची जवाबदारी याचे वर आली त्याच्या मागे पत्नी10वर्ष मुलगी1मुलगा व दोन लहान भाऊ आहे त्याच्या आत्महत्या मुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे

या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हातचे गेले त्यात भाव नाही रब्बी मध्ये तसेच झाले जस जसे आकाशात ढग दाटून पाऊस येत होता तसेच त्याच्या मनात पेरणी कशी करावी हा विचार होता3मे पाऊस झाला म्हणून तो झाडा खाली बसून विचार करीत बसला सर्व रस्ते बंद झाले पेरणीसाठी फक्त1महिना बाकी आहे या चिंतेत तो3ते4दिवसा पासून होता शेवटी कीटकनाशके प्राशन करून त्याने स्वतःची जीवनयात्रा संपवली शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणा मुळे युवा शेतकरी आत्महत्या करीत असल्याची ओरड जनसामान्यांच्या मनात आहे

Copyright ©