पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
04.मे.2023 रोजीचा पंजाबराव डख हवामान अंदाज
4, मे 5 आणि 6 मे ला विदर्भा आणि मराठवाड्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. तर
आज दु. 3 – 4 नंतर पाऊस सुरू होऊ शकतो.
उत्तर महाराष्ट्र, दक्षीण महाराष्ट्र, पश्चीम महाराष्ट्र, कोकण पट्टीचा अंदाज खालील प्रमाणे-
(ठिकाणे पुढील प्रमाणे- नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, आटपाडी, जत, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर)
वरील ठिकाणी दि. 6, 7,8 दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या आंब्याचे, द्राक्षाची काळजी घ्यावी. तसेच या काळात विजा आणि गारा (विशेषत: कोकण पट्टी) पडणार आहे. तर त्यानुसार काळजी घ्यावी. त्यानंतर दि. 9 ते 16 मे दरम्यान संपुर्ण राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे. त्या नंतर पुढील तीन दिवस म्हणजेच दि. 17, 18, 19 मे दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुन्हा 21 आणि 22 हवामान कोरडे असेल. हा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेला हा अंदाज आहे.
Add Comment