यवतमाळ शैक्षणिक

जि. प. मा. शा. काटेबाई उर्दू माध्यमिक शाळेला जि. प. उच्च प्राथमिक उर्दू शाळा जाफर नगर येथे स्थलांतरित करा

 

यवतमाळ ः

जि. प. मा. शा. काटेबाई उर्दू माध्यमिक शाळा तहसील चौक यवतमाळ या शाळेला जि. प. प्राथमिक उर्दू शाळा जाफर नगर येथे स्थानांतरित करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यवतमाळ येथील समाज सेवक जुल्फीकार अहेमद उर्फ बबली भाई, मो. साजिद रिजवी पेंटर, हामी उल्ला खान, वहिद उल्ला खान, सैय्यद ईरशाद अली, मो. अली (बंटी), जिया उल करिम, फरासत खान, सलावत खान, सरफराज खान, शब्बीर खान, शेख तारिक, शेख आसिफ, शेख शकील यांनी दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील तहसील चौक स्थित जि. प. मा. शा. काटेबाई उर्दू माध्यमिक शाळा, जि. प. उच्च प्राथमिक उर्दू शाळा जाफर नगर येथे स्थानांतरित करण्याबाबत मागील दोन वर्षापासून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या बाबत निवेदन दिले होते. कारण या शाळेमध्ये जाफर नगर परिसरातील बहुतांश मुली जि. प. मा. शा. काटेबाई उर्दू माध्यमिक या शाळेत शिकत असून जाफर नगर ते तहसील चौक मुख्य रहदारीचा रस्ता जवळपास ४ कि. मी. अंतराचा आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ व ट्राफीक राहत असल्यामुळे लहान मोठे अपघात होतात. मागील ५ महिण्यापूर्वी या शाळेतील विद्यार्थीचे अपघात झाल्यामुळे दोन्ही पाय गमवावे लागले आहे. त्यामुळे पालकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जाफर नगर परिसरातील जि. प. उच्च प्राथमिक उर्दू शाळाद मध्ये जि. प. मा. शा. काटेबाई उर्दू माध्यमिक ही शाळा स्थलांतरित झाल्यास कोहीनूर सोसायटी, गुलशन नगर, त्रिवेणी नगर, आदर्श आझाद नगर, अलमास नगर, डेहणकर लेआउट या मुस्लिम बहुल परिसरातील बहुतांश मुली खाजगी शाळेतील शिक्षण सोडून आपल्या जि. प. च्या शाळेत शिकतात. त्यांच्या शिकण्याची तीव्र ईच्छा लक्षात घेऊन तसेच पालकांच्या भावनांचा सन्मान करुन जि. प. मा. शा. काटेबाई उर्दू माध्यमिक शाळा स्थानांतरित करावी व विद्यार्थी व विद्यार्थींना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन आज जि. प. मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.

Copyright ©