विदर्भ सामाजिक

देवळी शहरात पसरले घाणीचे साम्राज्य.

 

न.प. मुख्यअधिकाऱ्याचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष.

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

मागील दीड वर्षापासून देवळी नगर परिषद वर प्रशासकाचे राज्य आहे त्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या हेखेखोरपणा वाढलेला दिसत आहे देवळीकर जनतेला लहान लहान कामासाठी नगरपरिषद कार्यालयाच्या अनेक वेळा येणे जाने करावे लागत आहे नगरपरिषद ची संपूर्ण यंत्रणा निष्क्रिय झालेली दिसत आहे.
शहराच्या अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे,स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येणाऱ्या कचऱ्या गाड्या सुद्धा वेळेवर येत नाही अनेक वेळा घाणीची तक्रार करून सुद्धा नगरपरिषद कर्मचारी त्याकडे लक्ष देत नाही आणि या आठोड्यात अकाळी पावसाचे चांगलेच थैमान घातलेले आहे त्यामुळे साचलेल्या कचऱ्यातून दुर्गंध सुटत आहे त्यामुळे देवळी शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पूर्वीचे मुख्याधिकारी मिलींद साटोणे हे नेहमीच आजारी राहत होते त्यामुळे नगरपरिषद कर्मचारी आपल्या मन मर्जीने देवळी शहराचा तुगलकी कारभार चालवीत होते आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना ठेके देऊन त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होते परंतु या आठवड्यात नवीन मुख्याधिकारी सौरभ कावळे देवळी शहराच्या मुख्याधिकाऱ्यापदी रुजू झाले असता परंतु त्यांनी अजून पर्यंत नगरपरिषद कर्मचाऱ्यांना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेले दिसत आहे.
कारण देवळी शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे मुख्यता जय हिंद व्यायाम शाळेच्या रोडवर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे यापूर्वीही नालीतील सांडपाणी व घाणीतील साम्राज्य विषयी तक्रार झालेली आहे परंतु नगर परिषद ने अजून पर्यंत कोणतीच उपाययोजना केलेली दिसत नाही तसेच भाजी मार्केट,जुने प्राथमिक आरोग्य केंद्र, केदार लेआउट,तसेच देवळीच्या अन्य भागामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे मुख्यअधिकारी या घाणीच्या साम्राज्याकडे लक्ष देतील का असा प्रश्न देवळीकर जनता विचारत आहे.

Copyright ©