यवतमाळ शैक्षणिक

शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने, एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्थानिक कौशल भवन येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, सविस्तर वृत्त असे की, सुपर किड लर्निंग सेंटर च्या माध्यमातून प्रजापती नगर येथील कौशल भवनाच्या सभागृहात इयत्ता तिसरी ते दहावीतील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, व मराठी इंग्रजी वाचन स्पर्धांचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले होते, शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून एका अनोख्या उपक्रमाला यशस्वी केले, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेपासून वंचित राहावे लागते किंवा त्याचे ज्ञान वृद्धिंगत होत नाही याचे सर्वेक्षण केल्यानंतर वाचन व सुलेखन सोबतच चित्रकला स्पर्धेला आज सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला, या स्पर्धांमध्ये प्रत्येक गटात सुवर्ण व रोप्य पदकाचे प्रत्येकी 22 विद्यार्थी मानकरी ठरले, स्पर्धेनंतर लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात झाली, मराठी वाचन स्पर्धेमध्ये वर्ग तिसरी ते चौथीच्या गटात प्रथम क्रमांक रुद्रानी विजय वेट्टी, द्वितीय क्रमांक, पूजा पुरुषोत्तम इंदोरे, वर्ग पाचवीच्या गटात प्रथम क्रमांक रुबल रसिक दूध गवळी, सुलेखन स्पर्धेमध्ये वर्ग दहावीच्या गटात सौंदर्या प्रशांतगोफणे ह्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला, इंग्रजी वाचन स्पर्धेच्या वर्ग तिसरी ते चौथीच्या गटात साची कैठीकवार, पाचवी ते सहावीच्या गटात आण्विक पिसे, सातवी ते आठवीच्या गटात आर्यन चव्हाण, व नववी ते दहावीच्या गटात आस्था फुलझेले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर सातवी ते आठवीच्या गटात रिद्धी रवी कडू हिने द्वितीय क्रमांक पटकाविला, इंग्रजी सुलेखन स्पर्धेमध्ये तिसरी ते चौथीच्या गटात आदिती सुरेश शेलारे, हिने प्रथम तर, केतकी प्रशांत पळसोकर हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला, पाचवी ते सहावीच्या गटात आराध्या रितेश शेलारे ही प्रथम तर ईश्वरी तंबाखे ही द्वितीय आली, सातवी ते आठवीच्या गटात राजवीर राहुल राऊत हा प्रथम तर विदिशा पाईकराव ही द्वितीय पुरस्काराची मानकरी ठरली, नववी ते दहावीच्या गटात यश मंगाम ह्याने सुवर्णपदक पटकाविले, चित्रकला स्पर्धेमध्ये तब्बल पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविताना तिसरी ते पाचवीच्या गटात पूर्वाई बेलखेडे हिने सुवर्णपदक तर सारा जाचक हिने रोप्य पदक पटकाविले सहावी ते आठवीच्या गटात राजवीर राहुल राऊत हा प्रथम तर सानवी बासा ही द्वितीय ठरली, नववी ते दहावीच्या गटात आस्था फुलझेले पहिली तर श्रावणी आठवले द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली उर्वरित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रलय टीप्रमवार तर प्रमुख अतिथी म्हणून माझी प्राचार्य श्री दत्तात्रय मेश्राम, प्रमुख पाहुण्या बाबाजी दाते शाळेच्या प्राचार्य अस्मिता पळसोकर, प्रयास संस्थेच्या महिला प्रमुख प्राची ताई बनगिनवार तर विविध कलागुणांना वाव देऊन विद्यार्थी घडविणाऱ्या वैशाली शेटे व्यासपीठावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या संचालिका पुनम शेंडे यांनी प्रास्ताविक संगीता तूपोने तर आभार प्रदर्शन संगीता टीप्रमवार यांनी केले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपले योगदान दिले त्यात प्रामुख्याने राजेंद्र गावंडे, नितेश यादव, रवी माहूरकर, सुनील संकोचवार यांनी मोलाची भूमिका बजावली

Copyright ©