Breaking News यवतमाळ

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावणाऱ्या आरोपीस अटक

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावणाऱ्या आरोपीस अटक

आर्णी पोलिसांची कारवाई ९०,००० हजारांचा मुद्देमाल जप्त

आर्णी:- शहरातील पोस्ट ऑफिस जवळ राहणाऱ्या लक्ष्मी गावंडे ह्या त्यांच्या मोठ्या मुलाच्या घरी जात असताना,त्यांच्या घरासमोर अज्ञात इसम मोटारसायकल वर येऊन लक्ष्मी गावंडे यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम एकूण १२,००० किमतीची सोन्याची पोत हिसकावून फरार झाला होता.ही घटना सोमवार दि.१ मे रोजी आर्णी येथील पोस्ट ऑफिस जवळ घडली.सदर घटनेची फिर्याद लक्ष्मी गावंडे हिने आर्णी पोलीस स्टेशन ला दिली असता,या फिर्यादिवरून आर्णी पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध भा.द.वि.चे कलम ३९२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हाच्या तपासात आर्णी पोलीस स्टेशन चे ठाणेदार शाम सोनटक्के यांनी दोन पथके तयार करून,एक पथक यवतमाळ च्या दिशेने व दुसरे पथक शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्या करिता रवाना केले.आर्णी येथील सराफा लाईन येथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक संशयीत दुचाकिस्वार आढळून आला.आर्णी पोलिसांनी त्या सीसीटीव्ही फुटेज मधील वाहनाचा व कपड्याचा कसोशीने शोध घेतला असता, आरोपी नामे गब्बरशहा मजीदशहा वय वर्ष २४ रा.शहापूर दिग्रस याचा सर्वत्र शोध सुरु केला.दिग्रस येथे रात्री दरम्यान दोन्ही पथके रवाना करून त्या ठिकाणी आरोपीची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात आली.आरोपीकडून एम एच २७ सीपी ७१४६ केटीएम कंपनीची मोटारसायकल किंमत ८०,००० हजार रुपये व दोन मोबाईल किंमत १०,००० हजार रुपये असा एकूण ९०,००० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीस तब्यात घेऊन मंगळवारी न्यायालयासमोर हजर करून,आरोपीचा पीसीआर घेण्यात येत आहे.सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरु आहे.

सदर कारवाई,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड,उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शाम सोनटक्के,पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे,विजय चव्हाण,अरुण पवार,संतोष गावंडे,नफिस शेख,ऋषिकेश इंगळे,मनोज चव्हाण,अरविंद जाधव,योगेश संकुलवार व मिथुन जाधव यांनी केली.

Copyright ©