अरसोड इंग्लिश क्लासेस , यवतमाळ, आयोजित उन्हाळी ऑन लाईन वक्तृत्व स्पर्धा
अरसोड इंग्लिश क्लासेस यवतमाळ यांच्यावतीने उन्हाळी ऑन लाईन वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या
स्पर्धेचे विषय 1) आधुनिक शिक्षण व्यवस्थेत आर्थिक वाढ आणि सामाजिक उत्थानाचे फायदे” 2) आधुनिक भारताच्या संघर्षातील नेते3] राजा शिवछत्रपती ( संबंधित विषय)१) सदर स्पर्धा खुली व निशुल्क असून या स्पर्धेत कुणालाही सहभागी होता येईल.
२) आपल्या भाषणाचा व्हिडीओ कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 8 मिनिटांचा असावा.
3) व्हिडीओ, वरील पैकी कोणत्याही एका विषयावर, मराठी किंवा हिंदी मध्ये असावा परंतु एडीट केलेला नसावा
४) परीक्षकांचे 70% गुण व आँनलाइन पसंतीचे 30% गुण (Likes, share , watch time) यावरुन विजेते निवडले जातील.
५) 15 मे 2023 पर्यंत व्हिडीओ पाठवावा. त्यानंतर आपल्याला यू ट्यूब लिंक पाठविली जाईल
६] 30 मे 2023 पर्यंतचे (Likes, share , watch time) पाहुन आँनलाइन गुण मिळतील.
७] एका स्पर्धकाने एकच व्हिडिओ पाठवावा. व्हिडिओ रेकॉर्ड करतांना मोबाईल आडवा धरावा.
८) अर्धवट माहीती, वादग्रस्त वक्तव्य तसेच शंकास्पद व्हिडीओ, काँपीराईट आलेले व्हिडीओ स्पर्धेतुन बाद केले जातील.
९) यवतमाळ बाहेरील स्पर्धकांची बक्षिसाची रक्कम आँनलाइन ट्रान्सफर केली जाईल व प्रमाणपत्र online मिळेल.
१०) स्पर्धे नंतरही हे व्हिडीओ Youtube वर राहतील म्हणजे त्याचा फायदा ईतर विद्यार्थ्यांना होईल व स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल.
११) स्पर्धेत कोणताही फेर बदल करण्या संबंधीचे सर्व अधिकार आयोजकांना असेल
१२) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेतील आपल्या व्हिडिओचा सहभाग म्हणजे आयोजकांच्या सर्व अटी व नियम आणि परीक्षकांचा निर्णय आपल्याला मान्य आहे असे समजले जाईल.
१३) व्हिडीओच्या सुरुवातीला आपले नाव , गाव, वर्ग व विषय सांगुन भाषणाला सुरुवात करावी.
१४) निकाल १० जून नंतर आँनलाइन घोषित केल्या जाईल. त्याकरीता स्पर्धकांनी व्यक्तीगत संपर्क करु नये. इतर माहिती करिता खाली दिलेल्या नंबर वर whatsapp करावा.
१५) प्रथम बक्षीस रुपये – 1000 . , दुसरे बक्षीस रुपये – 700, आणि तिसरे बक्षीस रुपये – 500, व्हिडिओ 9822716201 या नंबरवर नाव , गावासह व्हॉट्स ॲप करावा किवा arsodyogiraj@gmail.com वर मेल करावा असे आवाहन.योगीराज अरसोड यवतमाळ यांनी केले आहे
Add Comment