देवळी प्रतिनिधी:सागर झोरे
जय बजरंग धाबा रेस्टॉरंट वर पोलिसांची धाड
देशी,विदेशी दारू सहित एकूण ७८हजार २००रु चा माल जप्त
देवळी खुले असलेले दारूचे धंदे नियंत्रणात आणण्यासाठी मुखबीराच्या सूचनेवरून मिळालेल्या माहितीनुसार देवळी पोलिसांनी वर्धा यवतमाळ रोडच्या उडान पुलाखाली असलेला जय बजरंग धाबा व रेस्टॉरंट वर देवळी पोलिसांनी धाड टाकून देशी,विदेशी दारू सहित एकूण ७८,हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जय बजरंग धाबा रेस्टॉरंट चे मालक सचिन रामभाऊ तडस वय ४४ वर्ष रा.वॉर्ड नं २ यांच्यावर दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.
मागील अनेक दिवसापासून जय बजरंग धाबा व रेस्टॉरंट वर खुलेआम दारूविक्री होत असल्याचे देवळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली देवळी पोलिसांनी धाड टाकून दोन पंचांच्या समक्ष देशी विदेशी दारू सहित अन्य साहित्य जप्त केले या कारवाईमध्ये पोलीस शिपाई गणेश वैद्य,पोलीस शिपाई मनोज नप्ते,पोलीस शिपाई कुणाल हिवसे सहित अन्य पोलीस कर्मचाऱ्याने कारवाई केली परंतु देवळी पोलिसांना देवळी मध्ये सुरू असलेली दारू विक्री बंद करण्यासाठी उशिरा जाग का आला अशा प्रश्न देवळीकर जनता विचारत आहे.
Add Comment