Breaking News यवतमाळ

वन अधिकाऱ्याचा अडमुठ पना, नेमका काय त्या फाशे पार्ध्यांचा गुन्हा 

वन अधिकाऱ्याचा अडमुठ पना, नेमका काय त्या फाशे पार्ध्यांचा गुन्हा 

कळंब तालुक्यातील नरसापुर गट क्रमांक १४२ मध्ये दहा हेक्टर ओपन वाटिका करिता जागा साफसफाई करून वनपरिक्षेत्र जोडमोहा अंतर्गत जागेची आखणी उपक्रम सुरू आहे. मात्र या जमिनीवर फासे पारधी समाज गेल्या २० ते २५ वर्षापासून शेती करत असुन मिळालेल्या उत्पननातून आपला उदरनिर्वाह करीत असताना या दलित फासे पारधी कुटुंबांना वनविभागा मार्फत नोटीस देउन जागा खाली करण्याची मुद्दत देण्यात आली होती मात्र मुद्धती पूर्वच वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी यांनी आडमुठ् धोरण अवलंबून फासे पारधी विरुद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली आहे पारधी यांच्या शेतात पोकल्यांड मशीन लाऊन खोदकाम करण्याचा सपाटा लावला आहे. स्वातंत्र्य देशात अधिकाऱ्याची हुकूम शाही सुरू आहे हेच का ? अच्छे दीन असा सवाल करण्यात येत आहे. जोडमोहा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या अडमुठ धोरणा विरोधात फासे पारधी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात दी.२८/०९/२०१४ भारतीय वन अधिनियम ९२७ कलम ६|(१) ह व २६|(१) फ अन्वये क्रमांक रा प स|जकास| व कॅम्पा|शि – ली|२|१९९|२०२३-२ ४ यवतमाळ४४४|००१|दी.२४/४/२०२३ रोजी सुनावणी करिता नोटीस आलेली होती परंतु सुनावणी होणार नाही तोपर्यंत खोदकाम बंद करावे अशी मागणी वनविभाग कार्यालय यांना दिले आहे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी हे अधिकारी अतिक्रमन हटवण्याच्या नावाखाली गोरगरिबांच्या जीवनाशी खेळखंडोबा करीत असल्याचे दिसून येत आहे. कळंब तालुक्यातील नरसापुर परिसरात गट क्रमांक १४२ हि जमीन वन विभागाची असल्याचे बोलले जात आहे त्यावर जवळपास २० ते २५ वर्षापासून फासे पारधी समाजातील ३० ते ३५ कुटंब शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. या उपजाऊ जमिनीवर पारधी समाज गेल्या पंचवीस वर्षां पासून राहत आहे तर आपली उपजीविका करण्यासाठी जमिनीवर काबाड कष्ट करून आपले व आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करीत असताना. येथील वन अधिकारी यांनी आपली मनमानी करीत पारधी समाजाला वेठीस धरून घरा पासून व जमिनी पासून बेदखल करण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू केला आहे ,एकीकडे शासन जो वेक्ती वीस वर्ष शेती करीत असेल ती शेती त्यांचे नावे देण्याच्या घोषणा करते आणि मुजोर वन अधिकारी हुकूम शाही करते वनविभागाने ही कार्यवाही इथेच थांबवावी अन्यथा आम्ही वनविभाग कार्यालय जोडमोहा येथे तीव्र आंदोलन करू असा इशारा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे व प्रदेश युवाअध्यक्ष प्रफुल इंगोले, जिल्हाध्यक्ष विलास पवार व इतर फासे पारधी समाजातील चरण दौलत, प्रताप राठोड ,आकाश पवार, सुनील चव्हाण, सौ कामिनी काळे, सौ. प्रेमी चव्हाण, उमेश काळे, विकास पवार यांनी दिली आहे

Copyright ©