यवतमाळ सामाजिक

१मे महाराष्ट्र दिनाच्या शासकीय गुणगौरव सोहळ्यात डॉक्टर अंजली गवार्ले यांचा सत्कार

१मे महाराष्ट्र दिनाच्या शासकीय गुणगौरव सोहळ्यात डॉक्टर अंजली गवार्ले यांचा सत्कार

बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे महाराष्ट्र दिनाच्या गुणगौरव सोहळ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्याचा सत्कार करण्यात आले.

यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ अंजली गवार्ले

यांचा पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी प्रशस्तीपत्र देवून सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक पवन बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर , संगीता राठोड ,रुपाली निमकर डॉ स्नेहल कणीचे , यांचे उपस्तीथीत सत्कार करण्यात आला. गवार्ले हॉस्पीटलच्या संचालिका सुप्रसिद्ध मूळव्याध भगंदर तज्ञ डॉ अंजली गवार्ले यांनी स्त्रीयांच्या पाईलस फिशर, फिस्तुला ई गुदभागी होणाऱ्या विकारासाठी आयुर्वेद क्षारसुत्र पद्धतीने सर्वाधिक शल्यकर्म करण्याचा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविला आहे, ही यवतमाळ करांसाठी अभिमानाची बाब आहे. तसेच बारा वर्षपासून गवारले हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या यवतमाळ येथील जनतेला सेवा देत आहेत, विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ही त्या अग्रेसर असतात ,याची नोंद जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली, व त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन सौ शुभांगी भोयर व चंद्रबोधी गायवटे यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन सौ दिपाली नल्हे यांनी केले.

Copyright ©