Breaking News यवतमाळ

अवैध व्यावसाय फोपावले शहरात,पोलीस आहे तोऱ्यात,दाणा नाही राहिला खायला गरिबाच्या घरात!

यवतमाळ प्रतिनिधी पुरुषोत्तम कामठे

अवैध व्यावसाय फोपावले शहरात,पोलीस आहे तोऱ्यात,दाणा नाही राहिला खायला गरिबाच्या घरात!

पोलीस अधिकार्यांच्या 

 लाखोंनी हप्ता येतो ठाण्यात म्हणून भिंगरी,मटका ,जुगार क्लब खुले आम् सुरू आहे शहरात,

यवतमाळ:-येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालया पासून अगदी काही मिटर अंतरावर असणाऱ्या कॉटन मार्केट परिसरात भिंगरी हा एक मटक्यातील आकडा जोरा शोरात सुरु आहे.तर दुसरी कडे अप्सरा टॉकीज चौकात मटका या मटक्या पासून शहर पोलीस स्टेशन पण अगदी जवळ असून हे दोन्ही अवैध्य धंदे सुरळीत आणि खुले आम् राज रोस पने चालतात कसे,! तर ते सांगतात “आम्ही यांना सुरु केले खोके, तेव्हाच चुपचाप बसले हे बोके. म्हणूनच तर आमचे धंदे एकदम आहे ओके “आहे.असा यांचा कारभार चालतो

पण सर्वात आश्चर्याचा विषय म्हणजे शासकीय महाविध्यालंय व रुग्णालंय जवळ सुरु असणारा मटका हा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या इतक्या कमी अंतरावर आहे.की मटका व्यवसाईक छिंकला तरीही पोलीस अधीक्षकांना आवाज जाईल.परंतु पोलीस अधीक्षकांच्या कानाला जराही खबर नाही का? या परिसरात सतत प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यानं समवेत ये जा सुरू असते रोज चार ते पाच पोलीस वाहने तर येतातच मात्र या कडे कुणीही तिरपी नजरहि करून पहात नाहि हे मात्र तितकंच खर, आहे. या सर्व अवैध्य व्यावसायिकांना वेळेवर खोके द्यावे लागते तर महिन्या काठी एक तरी केस द्यावी लागते कारण आलेल्या वरिष्ठांना काय दाखवणार! त्या करीता आपली बाजू मजबूत करणे गरजेचे आहे .असा हि उपदेश व्यावसायिकांना दिल्या जातो म्हणूनच तर असे व्यावसायिक आपला धंदा खुले आम् चालवतो याचे हेच कारण आहे हि सर्व कहाणी व्यावसायिकच सांगतात.मग हा व्यवसाय बंद कसा होणार या व्यावसायामुळे दररोज चार ते पाच परिवार उध्वस्त होत आहे बनावट दारू खुले आम् विकल्या जाते हे सर्व असताना कुणीही कारवाई करीत नाहि. कारवाई होते ती लहान व्यावसायिकांवर,

भारत सरकारला दारू वर मिळणाऱ्या टॅक्स पासून सर्वांत मोठा फायदा आहे त्याच प्रमाने यवतमाळ पोलिसाना मटका व्यवसाईकां कडून मिळणाऱ्या हफ्त्या पासून सर्वांत मोठा फायदा होत आहे.यवतमाळ पोलीसच्या नाकर्ते पना मुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीला वाव मिळत असल्याने अल्पवयीन गुन्हेगारी दीवसे न दिवस वाढत आहे.याला जवाबदार प्रशासन आहे,प्रशासन स्वच्छ तर शहर स्वस्थ.होऊ शकते अशा प्रकारच्या अनेक तज्ञांनी प्रतिक्रिया वेक्त केल्या आहे.

Copyright ©