Breaking News यवतमाळ

जवळगाव येथे उघड्या रोहत्रीने घेतला गायी बळी

नेर प्रतिनिधी धनजय वानखेडे

जवळगाव येथे उघड्या रोहत्रीने घेतला गायी बळी

उघड्या रोहात्री मुळे तांगाव्यास आलेल्या विद्युत प्रवाहाने गायीचं मृत्यू

सरपंच व पोलीस पाटील यांची केवळ बघ्याची भूमिका

जवळगाव तालुका नेर जि.यवतमाळ येथे रोहितला विद्युत प्रवाह जोडला असल्याने सर्व रोहितला आणि आजूबाजूच्या तंगाव्याला विद्युत प्रवाह आला असल्याने मोठी हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अशीच घटना जवळगावं येथे त्या रोहत्री करंट असल्यामुळे गावातीलच जिजाबाई चिंचे यांची गाईला रोहित्रीचां स्पर्श झाल्याने मृत्युमुखी पडली यात तिचे 30 हजार रुपयाचे नुकसान झाले बाबत

गावातील सरपंच पोलीस पाटील यांच्याकडे त्याची तक्रार केली असता कोणीही त्याबद्दल दखल घेत नसल्याने हे पादाधिकारी केवळ नामधारी झाले आहे. त्यामुळे संतप्त जिजाबाईने पत्रकार शक्ती या वृत्ताच्या पत्रकारास फोनवरून सदर घटनेची माहिती दिली दोन महिन्या आधी सुद्धा याच गावातील म्हैस रोहितला जाऊन धडकली होती तेव्हा ती मृत्यू पावली, हि दुसरी घटना तरी कुणालाही जाग आली नाही

अशा रोहितला करंट येण्याच्या दोन ते तीन घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले असून याकडे ग्रामपंचायत किंवा वीज वितरक कम्पंनी लक्ष देत नाही या गाई किंवा म्हशी ऐवजी एखादा मनुष्याला जर याचा करंट लागला असता तर त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता अशी कल्पनाही सुद्धा आपण केल्यास आपल्या अंगावर शहारे उभे राहते. पण अशी तक्रार गावातील सरपंच

किंवा पोलीस पाटील यांना केल्यावर सुद्धा याची दखल कुणी घ्यायला तयार नसल्याने ग्रामस्थ सद्या रामभरोसे वास्तव्य करीत आहे.

त्याचे कडे कोनीही लक्ष देत नसल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे नेर तालुक्यातील जवळगाव येथील ग्रामपंचायतिने तर निष्काळजीपणाचा कळसच गाठलेला आहे अशी प्रतिक्रिया जिजाबाई चीचेनी पत्रकार शक्ती चे प्रतिनिधिशी बोलताना सांगितले जिजाबाई च्या नुकसानीची भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©