यवतमाळ राजकीय

दारव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांचे वर्चस्व; महाविकास आघाडीचा दारुण पराभव

दारव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांचे वर्चस्व; महाविकास आघाडीचा दारुण पराभव

यवतमाळ : दारव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात शिवसेना 18 पैकी 16 जागी विजयी झाली. दोन माजी मंत्री व व माजी आमदार तसेच महाविकास आघाडीचा दारव्हा येथे दारुण पराभव झाला.नेर कृषी उत्पन्न बाजार समिती 18 पैकी 10 जागी विजयी सत्ता राखली. दिग्रस गेल्या 20 वर्षांपासून बाजार समिती विरोधकांच्या ताब्यात होती. त्यातही 4 जागा जिंकल्या.दारव्हा,दिग्रस व नेर ह्या तीन पैकी दोन कृषी उत्पन्न बाजार समितीत मंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात दणदणीत विजय मिळवला.

शिवसेना (शिंदे गट)प्रणित

मा.ना. संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वातिल शेतकरी विकास पॅनलच्या १८ पैकी १६ जागेवर दणदणीत विजय झाला यात

सहकारी संस्था मतदारसंघातून

सुशांत इंगोले

गोविंदराव जाधव,मारुती जावरे,प्रकाश दुर्गे,देवराव पवार,सुभाष पवार शंकर भेंडे

सहकार संस्था मतदार संघ महिला राखीव

नानीबाई गावंडे,सुलोचना चव्हाण

 

वि.जा.भ.ज.

सुभाष राठोड

 

इ.मा.व.

विलास खेडकर

ग्रामपंचायत मतदार संघातून

आकाश ठोकळ ,रामा राठोड,विजय तायडे

 

आर्थिक दुर्बल घटक

प्रकाश राठोड

हमाल मापारी

प्रकाश उरकुडे

Copyright ©