यवतमाळ :
नेर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान झाल्यानंतर अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात पालकमंत्री संजय राठोड यांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले, तर माजी मंत्री माणिकराव ठाकरे व संजय देशमुख यांना धक्का सहन करावा लागला. नेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल रात्री उशिरा हाती आले. यात एकूण १८ जागापैकी उध्दव ठाकरे आणि काँग्रेस आघाडी ८ आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी युतीला १०दहा जागा मिळाल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीने राजकिय वातावरण चांगलेच तापले होते. प्रचारादरम्यान आरोप- प्रत्यारोपाचा धुरळा उडाला. परंतु, पालकमंत्री संजय राठोड यांचे असलेले काम आणि सर्वसामान्य लोकांसोबत असलेला जनसंपर्क विरोधकांवर भारी पडला. निकाल जाहीर होताच पालकमंत्री राठोड समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
Add Comment