काँग्रेस- उद्धव ठाकरे गटाने विजयी, भा. ज. प.धक्का महाविकास आघाडीने जिंकल्या ११ जागा
यवतमाळ प्रती: यवतमाळ बाजार समितीमध्ये काँग्रेस व उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आणि शिवसेनेचे (ठाकरे) संतोष ढवळे,गजानन डोमाळे यांच्या नेतृत्वात सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. १५ पैकी ११ जागा मिळवित काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले. यवतमाळ बाजार
समितीमध्ये काँग्रेस- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, गाडे पाटील गट आणि भाजप असे स्वतंत्र तीन पॅनल उभे होते. १५ पैकी ११ जागांवर विजय
मिळविण्यात काँग्रेस- उद्धव
बाळासाहेब ठाकरे गटाला यशमिळाले आहे. तर देशात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. सर्वसाधारण गटातून शिवसेनेचे किशोर इंगळे (२४६ मते), काँग्रेसचे ब्रह्मानंद काळे (२३८), काँग्रेसचेगुणवंत डोळे (२४४), काँग्रेसचे शेख जब्बार उस्मान (२३४), शिवसेनेचे रुपेश सावरकर (२३२), काँग्रेसचे रवी ढोक (२३१) आणि काँग्रेसचे गोविंद वंजारी २३८ मते घेऊन विजयी झाले. महिलांसाठीच्या दोन्ही जागांवर काँग्रेसने विजयी झेंडा फडकविला. नीता शेंगोळे (२३७) आणि शोभा दोनाडकर २२८ मते घेऊन विजयी झाल्या. इतर मागासवर्ग गटातून काँग्रेसचे वासुदेव गुघाने २४१ मते घेऊन विजयी झाले. तर विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून शिवसेनेचे संजय राठोड यांनी २४९मते घेत विजय मिळविला. सर्वसाधारण गटातील दोनही जागां भाजप विजयी झाली आहे. अजय ६ (३१६), श्रीकांत देशमुख (३२१)) विजयी झाले. तर अनुसूचित जाती- जमाती गटातून भाजपचे यू.डी. आगरे ३४४ मते घेऊन विजयी झाले. आर्थिक दुर्बल घटक गटातही भाजपला विजय मिळाला. येथे ३२ मते घेऊन योगेश राठोड विजयी झाले, निवडणूक निकाल जाहीर होताच काँग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकत्यांनी विजय ऊत्सव साजरा केला.
Add Comment