यवतमाळ
पोलिस प्रशासनात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाणारे पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह यवतमाळ जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जाहीर झाले आहे.
पोलिस दलात कार्यरत असताना केलेल्या उत्तम कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्यपदकानंतर याबाबतची घोषणा केली जाते. बुधवार, दि. २६ एप्रिलला राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानुसार सन २०२२ च्या महासंचालक सन्मानचिन्ह पदकाची यादी जाहीर झाली आहे.
यवतमाळ येथील दामिनी पथक (भरोसा सेल) प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विजया पंधरे, सायबर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विकास मुंडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद जिड्डेवार, पोलिस कर्मचारी निलेश दायमा, नरेश राऊत, सुनील मेश्राम, या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
राज्य पोलिस दलात उल्लेखनीय, वैशिष्ट्यपूर्ण सेवांसाठी २०२२ या वर्षासाठींची पोलिस महासंचालक सन्मान जाहीर करण्यात आले आहे. २०२२ वर्षासाठी राज्यातील ८०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मान केला जाणार आहे. पोलिस महासंचालकांकडून दरवर्षी दलात उत्तम सेवेसाठी कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. जिल्ह्यातील पोलिस दलात उत्कृष्ट कार्याबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन सोमवार, दि. १ मे रोजी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. पोलिस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह दिली जाते. यामध्ये सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देण्यात येते. राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने सन्मानचिन्हासाठी निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे बुधवार, दि. २६ एप्रिलला जाहीर केली आहे.
Add Comment