यवतमाळ शैक्षणिक

लो. बा. अणे महिला महाविद्यालयामध्ये ठसा छपाई (Block Printing) ची कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी

यवतमाळ

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथील गृह अर्थशास्त्र विभागाअंतर्गत ठसा छपाई(Block Printing) ची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे होते ,त्यांनी विद्यार्थिनींना ब्लॉक प्रिंटिंग च्या माध्यमातून आपण कशाप्रकारे रोजगार मिळू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले व मुलींशी संवाद साधला तसेच कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका म्हणून प्रा. अंशुमा अग्रवाल मॅडम लाभल्या होत्या त्यांनी ठसाचे प्रकार, ठसा छपाई करीता रंगाची निवड, ठसा छपाई करताना कापडाच्या पोतानुसार कसे रंग वापरायचे व कापडावर कशा पद्धतीची ठसा छपाई करायची याबद्दल मार्गदर्शन केले तसेच कापडावर ठसा छपाई करताना रंगसंगती कशा पद्धतीची करायची याबद्दलची माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मोनाली सलामे , डॉ. सरिता देशमुख, प्रा. सुवर्णा गादगे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन कु. पुजा मानकर तर आभार प्रदर्शन कु. पल्लवी सावरकर हिने केले.

Copyright ©