यवतमाळ शैक्षणिक

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत दि. २६ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

 

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय निरीक्षणगृह / बालगृह (मुलांचे) या संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या विधी संघर्ष ग्रस्त (उन्मार्गी) व काळजी व संरक्षणाची गरज असलेले (अनाथ, निराधार,निराश्रित) मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकाविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत दि. २६ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत तीन दिवशीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडांगण, विविध क्रीडा स्पर्धा, संस्थेच्या सभागृहात बैठे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमाचे मा. श्री. प्रशांत थोरात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सर्व प्रवेशित बालके सहभागी झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. नंदा खुरपुडे, यांचे हस्ते रनिंग स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून झाले. या प्रसंगी बाल न्याय मंडळ प्रतिनिधी श्री राजू भगत, बाल कल्याण समिती प्रतिनिधी तथा अॅड. लीना आदे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक, संस्था अधीक्षक गजानन जुमळे, समुपदेशिका श्रीम. पूजा राठोड यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
तीन दिवशीय आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत क्रीडास्पर्धा अंतर्गत १०० मीटर धावणे, खो-खो, कब्बडी, लांब उडी, फुटबॉल, बॅडमिटन, दोरीवरच्या उड्या इ. मैदानी खेळ घेण्यात आले. तर बुद्धिबळ, कॅरम, लुडो, सापशिडी, मनोरंजनात्मक खेळ इ. इन डोअर गेम व सामुहिक गीत गायन, डान्स, वैयक्तिक सादरीकरण सादर करून प्रवेशितांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
क्रिडा महोत्सवा दरम्यात राष्ट्रीय क्रिडा व्यक्तिमत्व / क्रीडा शिक्षक मार्शल आर्ट व स्केटिंग रोल बॉल स्पर्धा क्रीडा प्रशिक्षक संजय कोल्हे यांनी व्यक्तिमत्व विकासात खेळाचे महत्व व भूमिका यावर मार्गदर्शन केले. व भविष्यात आपणास क्रीडा विषयी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देवून क्रीडा विषयक कोणतीही अडचण असल्यास आठवा मार्गदर्शन हवे असल्यास अधीक्षकांमार्फत त्यांचे पर्यंत पोह्चविल्यास ती सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले. श्रीम. अंजू झाडे राष्ट्रीय बॉस्केट बॉल क्रीडा प्रशिक्षक यांनी जीवनात गुरुचे महत्व बोध कथेतून पटवून दिले, बालकाचा खेळ घेवून वातावरणात प्रसंन्नता आणली. श्री अभिजित पवार राष्ट्रीय फुटबॉल तथा योगा क्रीडा प्रशिक्षकयांनी मुलांना मनशांती साठी योगाचे महत्व सांगून योगाचे धडे दिले.
समारोप समारंभ प्रथम न्याय दंडाधिकारी तथा अध्यक्ष बाल न्याय मंडळ मा. न्या. सुप्रिया लाड मॅडम यांचे हस्ते बॅडमिटन खेळाचे उद्घाटन करून समारोप साजरा करण्यात आला या प्रसंगी क्रीडा प्रशिक्षक अॅड. लीना आदे बाल कल्याण समिती सदस्या अॅड. प्राची निलावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, कायदा तथा विधी अधिकारी महेश हळदे, अधीक्षक गजानन जुमळे उपस्थितीत होते. सादर कार्यक्रमा करीता बाल कल्याण समिती अध्यक्ष श्री. वासुदेव डायरे, सदस्य बाल कल्याण समिती, अनिल गायकवाड बाल न्याय मंडळ सदस्य अॅड. काजळ कावरे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वितेसाठी परीविक्षा अधिकारी राजू गौरकार, लिपिक सुनील हारगुडे, काळजी वाहक अविनाश राऊत, आकाश खांदवे, मंगेश वाघाडे, प्रतिक जुमळे यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे सहकार्याने व महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविध्यालय व सावित्री ज्योतीराव फुले समाजकार्य माहाविध्यालायातील क्षेत्र कार्य विद्यार्थ्यानी स्वयंसेवक म्हणून मोलाचे योगदान दिले संस्थेतील सर्व बालके यांनी वैयक्तिक व सांघिक खेळ, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सहभाग घेवून आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आनंद लुटला. व मोठ्यांनी सुद्धा लहान होवून छोट्या बरोबर खेळात सहभागी होवून लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या.

 

Copyright ©