राज्यभारत आज जिल्हापरिषद प्राथमिक शाळामध्ये शाळा पूर्व तयारीचा पहिला टप्पा पडला पार!
प्रतिनिधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहा येथे शाळा पूर्व तयारी म्हणुन दिनांक 28 एप्रिल 2023 ला सकाळी 9 वाजता ढोलताशा व लेझीम पथकासह पहिला वर्ग प्रवेश पात्र विध्यार्थी,पालक,शिक्षक,शाळां सामिती,प्रमुख मान्यवार प्रभात फेरीत सहभागी झाले होते.शाळेच्या मुख्य प्रवेश द्वारात करताच पुष्पगुच्छ देऊन विध्यार्थी व पालकांचे स्वागत करण्यात आले आहे.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपकभाऊ कुमरे,समिती सदस्य,पालक उपस्थित,सावित्री जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय विध्यार्थी उपस्थितीत होते.महात्मा फुले सत्यशोधक विद्यापिठाचे अध्यक्ष तथा व्य वस्थापकिय संचालक डॉ. ज्ञानेश्वर गोरे (गोबरे)यांनी सावित्रीबाईचे फोटोचे पूजन व रिबीन कापून उदघाट्न केले.उच्च श्रेणी मुख्याध्यापक पुरुषोत्तम ठोकळ यांनी प्रास्ताविक करून पाल कांना शासकिय योजना,बालक्क, समजून सांगितले मूलभूत शिक्षण हक्कनियमानुसार पालक,शिक्षक जबाबदारी सांगितली.प्रा.कमल राठोड यांनी प्राथमिक शिक्षणाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले तर डॉ.गोबरे साहेब यांनी स्वतःचे वाढदिवसाच्या दिवशी 200 विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इंग्रजी सराव पाठ सोय देण्याची घोषणा केली.पालकांना चहा तर मुलाना खाऊ वाटप करण्यात आला आहे.सूत्रसंचालन गायत्री जुमनाके महाविद्यालयीन विद्यार्थीने केले.
Add Comment