Breaking News यवतमाळ सामाजिक

अनाधिकृतरित्या मांडुळ साप पकडणाऱ्यांवर वनविभागाची कार्यवाही

हिवरी प्रती
दि.26.एप्रिल 2023 रोजी मौजा पारवा ता.जि.यवतमाळ येथील गावात मोहन रामाजी कुमरे वय 35 वर्षे रा.पारवा हा इसम अनाधिकृतपने मांडुळ जातीचा साप पकडुन तस्करी करणे, त्यांच्याशी खेळ करून छायाचित्रण करत असल्यांची माहिती धनंजय वायभासे उपवनसंरक्षक यवतमाळ यांना मिळाली त्या वरून त्यांनी चेतन नेहारे वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व स्टॉप यांना पाठवुन कार्यवाही करण्यांच्या सुचना दिल्या.त्यानुसार पथक जाऊन बालु ऊर्फ मोहन रामाजी कुमरे याला वन्यजिव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2,9,51 अन्वये कार्यवाही करून वनगुन्हा क्रमांक 176316 दिनांक 26.एप्रिल.2023 अन्वये दाखल केला.मांडुळ जातीचा सापाची तस्करीसुध्दा केली जाते यावरच प्रतिबंध म्हणुन कार्यवाही करण्यांत आली.आरोपीला दिनांक 27.एप्रिल.2023 रोजी यवतमाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. सदर कार्यवाही धनंजय वायभासे उपवनसंरक्षक यवतमाळ, अनंत दिघोडे सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनात चेतन नेहारे वनपरिक्षेत्र अधिकारी,दुर्गासिंग गहरवाल वनपाल व वनरक्षक भास्कर नांदणे, नितीन ढेंगळे, उमेश पडवाल वाहनचालक रामेश्वर क्षीरसागर, विश्वास परडके यांनी केली असुन प्रकरणाचा सखोल तपास अनंत दिघोडे सहाय्यक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) हे करत आहे. सापाला अनाधिकृतपणे पकडणे त्याच्याशी खेळ करणे, छायाचित्रण करणे, तस्करी करणे, स्वत:च्या व ईतरांच्याजिवाशी खेळणे हा वन्यजिव संरक्षण अधिनियम अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा असुन या कार्यवाहीमुळे सापाची तस्करी करणाऱ्यावर आळा बसणार आहे. या कार्यवाहीमुळे वण्यप्रेमीकडुन आनंद व्यक्त करण्यांत येत आहे.

Copyright ©